IPL 2022 RR vs GT: कॅप्टन बनल्यानंतर Hardik चा खेळच बदलला, आधी डाव सावरला नंतर फोर-सिक्सची बरसात, 167 च्या स्ट्राइक रेटने धावा

IPL 2022 RR vs GT: हार्दिक पंड्याने (Hardik pandya) आयपीएल 2022 (IPL 2022) मधून जोरदार कमबॅक केलं आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात त्याने आज कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला.

IPL 2022 RR vs GT: कॅप्टन बनल्यानंतर Hardik चा खेळच बदलला, आधी डाव सावरला नंतर फोर-सिक्सची बरसात, 167 च्या स्ट्राइक रेटने धावा
गुजरात टायटन्स कॅप्टन हार्दिक पंड्या Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 10:10 PM

मुंबई: हार्दिक पंड्याने (Hardik pandya) आयपीएल 2022 (IPL 2022) मधून जोरदार कमबॅक केलं आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात त्याने आज कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. त्याने सलग दुसर अर्धशतक झळकावलं. त्याने 52 चेंडूत नाबाद 87 धावा फटकावल्या. यात आठ चौकार आणि चार षटकार होते. पाठीच्या दुखण्यामुळे हार्दिक पंड्या बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पंड्या त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसत आहे. बॅटिंगच्या बरोबरीने तो चांगली गोलंदाजीही करतोय. आयपीएलमध्ये खेळताना जुन्या ऑलराऊंडर हार्दिकची झलक दिसतेय. हार्दिक पंड्या आज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यावेळी टीमची स्थिती दोन बाद 15 धावा होती. गुजरातचा संघ अडचणीत होता. कुलदीप सेनच्या ओव्हरमध्ये त्याने तीन चौकार लगावले व दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

सर्वाधिक धावा करण्यामध्ये हार्दिक टॉपवर

त्यानंतर युजवेंद्र चहल आणि अश्विनच्या ओव्हरमध्ये मोठे फटके खेळला. हार्दिक पंड्याने 33 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह 50 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धही त्याने अर्धशतक झळकावलं होतं. आधी हार्दिकने डाव सावरला नंतर फटकेबाजी केली. त्याने नाबाद 87 धावा केल्या. आयपीएलमधला त्याचा हा दुसरा सर्वोच्च स्कोर आहे. या सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये हार्दिक टॉपवर पोहोचला आहे. जोस बटलरला त्याने मागे सोडलं.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

केकेआर आणि राजस्थान विरुद्ध नेहमीच जबरदस्त खेळ

आयपीएल 2019 मध्ये हार्दिकने 91 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. केकेआर विरुद्ध त्याने या धावा फटकावल्या होत्या. हार्दिकने आयपीएलमध्ये केकेआर आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांविरुद्ध नेहमीच दमदार खेळ दाखवला आहे. 2015 मध्ये केकेआर विरुद्ध नाबाद 61 आणि राजस्थान विरुद्ध नाबाद 60 धावा केल्या होत्या.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.