Hardik Pandya: मोठ्या जबाबदारीआधी हार्दिक पंड्याने सुरु केली पहिल्या परीक्षेची तयारी
हार्दिक पंड्या कोचिंग स्टाफची वाट बघत बसला नाही, त्याने थेट...
वेलिंग्टन: T20 वर्ल्ड कप 2022 मधील पराभव मागे सोडून टीम इंडिया पुढे गेलीय. टीम इंडियाचा पुढचा टप्पा न्यूझीलंड विरुद्धची सीरीज आहे. इथे टीम इंडियाला वनडे आणि टी 20 मालिका खेळायची आहे. टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूंना या सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. वर्ल्ड कप सुरु असतानाच, न्यूझीलंड सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली होती.
हार्दिक पंड्याला न्यूझीलंड दौऱ्यात टी 20 टीमच कॅप्टन बनवण्यात आलय. टीम इंडियाने या सीरीजसाठी तयारी सुरु केलीय. सोमवारी वेलिंग्टनमध्ये त्यांनी सराव केला.
खेळाडूंचा आज जोरदार सराव
युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत. टीमच अधिकृत सराव सत्र उद्या मंगळवारपासून सुरु होईल. काही खेळाडूंनी आज जोरदार सराव केला. काही खेळाडूंनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जीममध्ये व्यायाम करतानाचे फोटो पोस्ट केलेत. कोचिंग स्टाफशिवाय हार्दिकने सराव सुरु केलाय. तो मैदानात प्रचंड मेहनत घेतोय.
कोचिंग स्टाफमध्ये काय बदल?
फक्त खेळाडूच नाही, कोचिंग स्टाफलाही आराम देण्यात आलाय. मुख्य कोच राहुल द्रविड, गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे आणि बॅटिंग कोच विक्रम राठोड यांना आराम देण्यात आलाय. राहुल द्रविड यांच्याजागी व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्याकडे कोचिंगची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
ऋषिकेश कानिटकर फलंदाजी प्रशिक्षक आहेत. साईराज बहुतुले गोलंदाजी आणि मुनीष वाली फिल्डिंग कोचची जबाबदारी संभाळणार आहेत. हे सर्व सोमवारी न्यूझीलंडमध्ये पोहोचतील. मंगळवारपासून अधिकृत सराव सत्र सुरु होईल.
न्यूझीलंडमध्ये काय असेल आव्हान?
न्यूझीलंडमधील वातावरण टीम इंडियासाठी आव्हानात्मक असेल. इथल्या विकेट्सवर ऑस्ट्रेलियाच्या विकेट्सपेक्षा चेंडू जास्त स्विंग होतो. भारतीय फलंदाजांसाठी धावा बनवणं इथे सोपं नाहीय.
T20 आणि वनडे मॅचेस किती तारखेला?
भारताला न्यूझीलंड दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची सीरीज खेळायची आहे. टी 20 सीरीजची सुरुवात 18 नोव्हेंबरपासून होईल. 20 आणि 22 नोव्हेंबरला दुसरा आणि तिसरा टी 20 सामना खेळला जाईल. त्यानंतर वनडे मालिका सुरु होईल. वनडेमध्ये शिखर धवन टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. वनडे सीरीज 25 नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरु होईल. 27 आणि 30 नोव्हेंबरला दुसरी आणि तिसरी वनडे मॅच होईल.