hardik pandya and natasa divorce: घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याला नताशाला किती रक्कम द्यावी लागणार?

Hardik Pandya and Natasha divorce: सन 2020 मध्ये हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी लग्न केले होते. या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या पद्धतीने लग्न केले होते. या सेलिब्रिटी कपल त्यावेळी खूप चर्चेत आले होते. चार वर्षांचे हे नाते आता संपुष्टात आले आहे.

hardik pandya and natasa divorce: घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याला नताशाला किती रक्कम द्यावी लागणार?
Hardik Pandya and Natasha divorce
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 7:38 AM

hardik pandya net worth: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये कमाल केली. परंतु विश्वविजेतेपदानंतर त्याला एक, एक धक्के बसत आहे. गुरुवारी बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यात त्याचे उपकर्णधारपद काढण्यात आले. त्यानंतर हार्दिकची पत्नी नताशाने त्याच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये घटस्फोट झाला आहे. हार्दिकने सोशल मीडिया यासंदर्भात पोस्ट केली.

हार्दिक पंड्याला 70 टक्के रक्कम द्यावी लागणार?

आयपीएल 2024 दरम्यान त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात मतभेद झाले होते. त्यासंदर्भातील बातम्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर येत होत्या. यामुळे नताशा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही हार्दिकसोबतचा कोणताही फोटो शेअर करत नव्हती. यामुळे दोघांमध्ये सुरळीत काहीच नसल्याचे स्पष्ट संकेत दिले जात होते. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (18 जुलै) रात्री हार्दिकने नताशासोबत घटस्फोटाच्या वृत्ताला सोशल मीडियातून दुजोरा दिला. घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याला त्याच्या कमाईतील 70 टक्के रक्कम नताशाला द्यावी लागू शकते.

हे सुद्धा वाचा

हार्दिकची संपत्ती आईच्या नावे

हार्दिक पंड्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्याने सांगितले होते की, त्याचे घर आणि कार त्याच्या आईच्या नावावर आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक म्हणतो, ‘माझ्या वडिलांच्या खात्यात आईचे नाव आहे, भावाच्या खात्यात आईचे नाव आहे आणि माझ्या खात्यातही आईचे नाव आहे. सर्व काही तिच्या नावावर आहे. कारपासून घरापर्यंत…सगळं तिच्या नावावर आहे.

चार वर्षांपूर्वी झाले होते लग्न

सन 2020 मध्ये हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी लग्न केले होते. या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या पद्धतीने लग्न केले होते. या सेलिब्रिटी कपल त्यावेळी खूप चर्चेत आले होते. चार वर्षांचे हे नाते आता संपुष्टात आले आहे. तसेच दोघे मिळून मुलगा अगस्त्यची जबाबदारी उचलणार आहे. नताशा घटस्फोटच्या निर्णयानंतर तिच्या आई-वडिलांकडे निघून गेली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.