IND vs WI 3rd T20: Hardik Pandya ची एकदम ‘कडक’ बॉलिंग, दांडी गुल केल्यानंतर स्टम्पसचेच दोन टप्पे पडले
IND vs WI 3rd T20: टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. दुखापतीमधून पुनरागमन केल्यापासून त्याने मागे वळून बघितलेलच नाही.
मुंबई: टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. दुखापतीमधून पुनरागमन केल्यापासून त्याने मागे वळून बघितलेलच नाही. आधी दक्षिण आफ्रिका त्यानंतर आयर्लंड, इंग्लंड आणि आता वेस्ट इंडिज विरुद्ध हार्दिक पंड्याचं कमालीच प्रदर्शन सुरु आहे. मंगळवारी वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. हार्दिकने या सामन्यात एक विकेट घेतानाच 4 ओव्हर्स मध्ये 19 धावा दिल्या.
हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड
तिसऱ्या टी 20 सामन्यात हार्दिक पंड्याने वेस्ट इंडिजला पहिला झटका दिला. त्याने ब्रँडन किंग आणि कायली मायर्सची सलामीची पार्टनरशिप तोडली. 8 व्या ओव्हर मध्ये हार्दिक पंड्याने आपल्या स्लोअर चेंडूवर ब्रँडन किंगला चकवलं. चेंडू थेट स्टम्पसवर आदळला. हार्दिकने टाकलेला चेंडू जबरदस्त होता. किंगची दांडी उडवताना स्टम्पसचा दोन टप्पे लांब उ़डाला. हार्दिक पंड्याने या विकेटसह टी 20 इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये आपल्या 50 विकेट पूर्ण केल्या. पंड्या असा पहिला भारतीय खेळाडू आहे, ज्याने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 50 विकेट घेतानाच 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
हार्दिक पंड्या टी20 मधील मोठा मॅच विनर
हार्दिक पंड्याने टी 20 इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये 802 धावा केल्या आहेत. तो 9 वा क्रिकेटपटू आहे, ज्याच्या नावावर टी 20 मध्ये 50 विकेट आणि 500 पेक्षा जास्त धावा आहेत. शाकिब अल हसन, शाहिद आफ्रिदी, जॉर्ज डॉकरेल, ड्वेन ब्राव्हो, मोहम्मद नबी, मोहम्मद हफीज, केविन ओ ब्रायन आणि थिसारा परेरा या खेळाडूंच्या क्लब मध्ये हार्दिक पंड्याचा समावेश झाला आहे.
A much-needed breakthrough from @hardikpandya7. #BrandonKing dismissed!
Watch all the action from the India tour of West Indies LIVE, only on #FanCode ? https://t.co/RCdQk12YsM@BCCI @windiescricket #WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/gdIl2Nxh5C
— FanCode (@FanCode) August 2, 2022
भारताच्या विजयानंतर मोठी गोष्ट बोलून गेला हार्दिक
भारताने तिसरा टी 20 सामना सात विकेटने जिंकला. 165 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर 6 चेंडू आधीच गाठले. विजयानंतर हार्दिक पंड्या मन जिंकून घेणारी एक गोष्ट बोलून गेला. “मेहनतीच्या बळावर मी पुनरामगन केलय. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही मेहनतीनेच उत्तम कामगिरी करु शकता” असं हार्दिक म्हणाला.