हार्दिक पंड्याने शोधलेल्या गोलंदाजाचा ‘कहर’, 4 ओव्हर मध्ये फलंदाजांचा वाजवला बँड
आयपीएल (IPL) नंतर तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) स्पर्धा होते. तामिळनाडू मधील स्थानिक संघ या स्पर्धेत खेळतात. या स्पर्धेच्या 25 व्या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोरने (Sai kishore) कहर केला.
मुंबई: आयपीएल (IPL) नंतर तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) स्पर्धा होते. तामिळनाडू मधील स्थानिक संघ या स्पर्धेत खेळतात. या स्पर्धेच्या 25 व्या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोरने (Sai kishore) कहर केला. चेपक सुपर जाइल्स आणि आयड्रीम तिरुप्पुर तमिझांस मध्ये झालेल्या सामन्यात साई किशोरने फलंदाजांची वाट लावून टाकली. साई किशोने त्याच्या कोट्यातील 4 षटकात 3 मेडन ओव्हर टाकल्या. त्याने फक्त 2 धावा देत 4 विकेट काढल्या. 4-3-2-4 असं त्याच्या गोलंदाजीचं पृथ्थकरण होतं. साई किशोर आयपीएल मध्ये गुजरात टायटन्स संघाकडून खेळला होता. हार्दिक पंड्याने या गोलंदाजावर विश्वास दाखवला. फलंदाजी बरोबर गोलंदाजीतही त्याने चमक दाखवली.
भन्नाट गोलंदाजी
साई किशोरने आधी 26 चेंडूत 19 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या टीमने 9 विकेट गमावून 133 धावा केल्या. त्यानंतर त्याने चेंडूने जलवा दाखवला. आयड्रीमचा डाव 73 धावांवर गुंडाळून चेपकने 60 धावांनी मोठा विजय मिळवला. आयड्रीमचा सलामीवीर एस अरविंद, आर.राजकुमार, फ्रान्सिस रॉकिन्स, अश्विन क्रिस्टची विकेट काढली. आयपीएल मध्ये साई किशोर गुजरात टायटन्सकडून खेळला. हार्दिक पंड्याने अनेकदाच त्याचं कौतुक केलं.
हार्दिक पंड्या किशोरचा फॅन
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रोमांचक विजय मिळवल्यानंतर हार्दिक पंड्या साई किशोरचा फॅन झाला होता. त्याने साई किशोरचं कौतुक केलं होतं. साई किशोर टेक्निक्ल गोलंदाज आहे. उंची आणि गती मुळे विकेटकडून त्याला अतिरिक्त लाभ मिळतो, असं हार्दिक पंड्याने म्हटलं होतं. तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत साई किशो ड्रॅग्स विरुद्ध मागच्या सामन्यात फ्लॉप ठरला होता. त्याला यश मिळालं नव्हतं. पण कोवाई किंग्स विरुद्ध 48 धावा फटकावल्या व 25 धावात 2 विकेटही घेतल्या होत्या.