पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करणार का? हार्दिक पंड्या म्हणाला…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज या दोन आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सामना खेळवला जात आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करणार का? हार्दिक पंड्या म्हणाला...
Hardik-Pandya
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 8:36 PM

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज या दोन आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सामना खेळवला जात आहे. विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याच्या आधीपासूनच एका भारतीय खेळाडूची मोठी चर्चा आहे. तो खेळाडू म्हणजे अष्टपैलू हार्दिक पंड्या. आजच्या सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर पंड्या स्टार स्पोर्ट्सच्या एका मुलाखती बोलत असताना त्याला गोलंदाजी करणार का? असा सवाल करण्यात आला, त्यावर पंड्या म्हणाला की, “माझी पाठ आता ठीक आहे. ही एक मोठी समस्या होती, परंतु मी सध्या गोलंदाजी करणार नाही. मी हळू हळू गोलंदाजी सुरू करेन. नॉकआउट सामन्यांच्या दरम्यान मी गोलंदाजी करण्यास सुरुवात करेन. तज्ज्ञांशी चर्चा करुन मला याबातचा निर्णय घ्यावा लागणार आहे. (Hardik pandya breaks silence over bowling against pakistan match in t20 world cup 2021)

आजच्या सामन्याबद्दल पंड्या म्हणाला, “मला परिस्थितीच्या जास्त प्रचारात जायचे नाही. माझ्या कुटुंबानेही याची खात्री केली आहे. मी सोशल मीडियापासून दूर राहतो कारण हे सर्व पाहून तुम्ही आणखी रोमांचित व्हाल. हे अगदी सोपे आहे, आम्ही आमच्या भावनिक होत नाही आणि गोष्टींकडे व्यावसायिक पद्धतीने पाहतो. आम्ही सर्वकाही तयार करण्याचे आणि योग्य प्रक्रियेचे पालन करण्याचे सुनिश्चित करतो. ”

भारत अडचणीत

भारत आणि पाकिस्तान या बहुप्रतिक्षित सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक झाली असून पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आहे. पाकिस्तानच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारताची बिकट अवस्था झाली आहे. भारताने पहिल्याच षटकात धडाकेबाज रोहित शर्माची विकेट गमावली तर तिसऱ्या षटकात के. एल. राहुलची विकेट गमावली. त्यानंतर सहाव्या षटकात सूर्यकुमार यादवची विकेट गमावली आहे. त्यामुळे भारताची 6 षटकात 3 बाद 36 अशी अवस्था झाली आहे.

भारताचे अंतिम 11

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तानचे अंतिम 11

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.

इतर बातम्या

India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने, महामुकाबल्याला अवघे काही तास शिल्लक

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

(Hardik pandya breaks silence over bowling against pakistan match in t20 world cup 2021)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.