487 धावा, IPL 2022 फायनलचा हिरो, पण तरीही Hardik Pandya वर नाही विश्वास

गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik pandya) IPL 2022 मध्ये सर्वोतम प्रदर्शन केलं. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग शिवाय त्याने यशस्वी नेतृत्व करुन स्वत:ला सिद्ध केलं.

487 धावा, IPL 2022 फायनलचा हिरो, पण तरीही Hardik Pandya वर नाही विश्वास
आयपीएलमध्ये हार्दिकनं दमदार कामगिरीनं अनेकांचं लक्ष वेधलंय.Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 7:03 PM

मुंबई: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik pandya) IPL 2022 मध्ये सर्वोतम प्रदर्शन केलं. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग शिवाय त्याने यशस्वी नेतृत्व करुन स्वत:ला सिद्ध केलं. हार्दिक पंड्याने पहिल्यांदा नेतृत्व करताना गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवलं. हार्दिकने संपूर्ण सीजनमध्ये 487 धावा फटकावल्या व फायनमध्ये तीन विकेट काढून हिरो ठरला. इतकी सर्वोत्तम कामगिरी करुनही मोहम्मद अझरुद्दीनला हार्दिक पंड्यावर विश्वास नाहीय. मोहम्मद अझरुद्दीनला हार्दिक पंड्याचा फिटनेस आणि सातत्यपूर्ण कामगिरी करण्याच्या क्षमतेवर शंका आहे. हार्दिक पंड्या सलग चार षटकं गोलंदाजी करु शकतो का? असं मोहम्मद अझरुद्दीन खलीज टाइम्सशी बोलताना म्हणाला. “त्याने चांगल प्रदर्शन केलं. पण दुखापतींमुळे तो सलग मालिकांमध्ये संघात दिसला नाही.

कधीपर्यंत चार ओव्हर टाकणार?

आता त्याने पुनरागमन केलय. चार ओव्हर टाकतोय. पण तो कधीपर्यंत चार ओव्हर टाकेल, हे कोणी सांगू शकत नाही. पण आम्हाला त्याला गोलंदाजी करताना पहायचे आहे. कारण तो एक ऑलराऊंडर आहे” असं मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला. हार्दिकला आयपीएल 2022 दरम्यानही दुखापत झाली होती. तो एक सामना दुखापतीमुळे खेळला नव्हता. काही सामन्यात त्याने गोलंदाजी केली नव्हती. अझरुद्दीन त्यामुळे हे मुद्दे उपस्थित करतोय.

पंड्याच्या गोलंदाजीचा वेग वाढला

हार्दिक पंड्याने आयपीएल 2022 मध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना धक्का दिला. त्याने नव्या चेंडूने गोलंदाजी केली. 140 किमी प्रतितासपेक्षा जास्त वेग होता. दिशा आणि टप्पा सुद्धा योग्य होता. अशा दमदार कामगिरीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत संधी मिळाली आहे. आता तिथे त्याचा रोल काय असेल? ते लवकरच समजेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.