Hardik Pandya च्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट, ‘या’ देशाचे डॉक्टर करणार उपचार
IND vs NZ | आता कशी आहे हार्दिक पंड्याची तब्येत?. हार्दिक पांड्या कुठे रिपोर्ट करणार? बीसीसीआयने हार्दिकबद्दल काय माहिती दिलीय? हार्दिक पांड्याला किती दिवस मैदानाबाहेर रहाव लागणार आहे? हार्दिक पांड्याबद्दल डॉक्टरांच मत काय आहे?
पुणे : वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा सुरु असताना टीम इंडियाला एक धक्का बसलाय. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला दुखापत झालीय. त्यामुळे तो पुढच्या सामन्यात खेळू शकणार नाहीय. काल बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात चेंडू अडवताना हार्दिक पांड्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली. टीम इंडियाचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. रविवारी धरमशाळा येथे ही मॅच आहे. पहिले तीन चेंडू टाकल्यानंतर हार्दिकने मैदान सोडलं. लगेच त्याला रुग्णालयात नेऊन स्कॅन करण्यात आल. हार्दिक पांड्या ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये असला, तरी सध्या त्याने बॉलर म्हणून परफॉर्मन्स दिलाय. वेगवान गोलंदाज म्हणून टीममध्ये खेळताना त्याने 3 सामन्यात 5 विकेट काढले आहेत.
हार्दिक पांड्यावर बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत उपचार करण्यात येणार आहेत. इंग्लंडचे स्पेशलिस्ट डॉक्टर हार्दिक पांड्यावर उपचार करतील. एका इंग्रजी वर्तमानपत्राने हे वृत्त दिलय. हार्दिकला काही इंजेक्शन्स देण्यात येणार असून 7 दिवसांचा त्याला ब्रेक देण्यात येईल. न्यूझीलंडनंतर भारताचा पुढचा सामना इंग्लंड विरुद आहे. 29 ऑक्टोबरला ही मॅच होईल. हार्दिक पांड्या या मॅचआधी फिट होईल. कारण न्यूझीलंडच्या सामन्यानंतर आराम करण्यासाठी त्याला आठवड्याभराचा वेळ मिळेल.
डॉक्टरांनी काय सांगितलं?
“हार्दिक पांड्याला NCA ला रिपोर्ट करायला सांगितलय. तो आता बंगळुरुला जाईल. त्याच्या डाव्या सांध्याचा रिपोर्ट तपासला जाईल. इंजेक्शन घेतल्यानंतर त्याला आराम पडेल. बीसीसीआयने इंग्लंडमधील स्पेशलिस्ट डॉक्टर बरोबर चर्चा केलीय. तो पुढच्या सामन्यात नाही खेळणार” असं इंग्रजी वर्तमानपत्राने बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटलं आहे. त्याला विराटचा आधार घ्यावा लागला
हार्दिकचा डावा सांधा दुखावल्यानंतर तो मैदानावर पडला. पायावर उभ राहण्यासाठी त्याला विराट कोहलीचा आधार घ्यावा लागला. बीसीसीआयचे फिजियो लगेच मैदानात धावत आले. प्राथमिक उपचार त्यांनी केले. रोहित आणि विराट दोघांशी चर्चा केल्यानंतर हार्दिक मैदानातून बाहेर पडला. पण त्यानंतर तो मैदानात आलाच नाही.