Virat Kohli Press : हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट, गोलंदाजी करु शकतो, विराट कोहलीने सांगितली टीम इंडियाची रणनीती
विराट कोहली म्हणाला की, आम्ही गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या निमित्ताने टी-20 क्रिकेट खेळत आहोत. आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहोत. टीममधील सर्व खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे.
दुबई : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया कशी असेल? टीम कॉम्बिनेशन कसं असेल? कॅप्टन कोहली कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरेल? हार्दिक पांड्या खेळणार की नाही? तो गोलंदाजी करेल का? टीम इंडियाची तयारी कशी सुरु आहे? अशा अनेक प्रश्नांवर सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरु आहेत. दरम्यान, यापैकी काही प्रश्नांची उत्तर आज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहेत. त्याने आज पत्रकारांशी संवाद साधला. (Hardik Pandya is perfectly fit, can bowl, Virat Kohli tolds Team India’s strategy)
विराट म्हणाला की, आम्ही गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या निमित्ताने टी-20 क्रिकेट खेळत आहोत. आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहोत. टीममधील सर्व खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये चांगला खेळ करु. विराटला यावेळी त्याच्या कर्णधारपदावरुन काही प्रश्न विचारण्यात आले, यातवर तो म्हणाला की, कर्णधारपदाबद्दल यापूर्वी अनेकदा बोललो आहे.
दरम्यान, विराटने हार्दिक पांड्याविषयीच्या अनेक प्रश्नांवर उत्तर दिली. तो म्हणाला की, पंड्याची प्रकृती सध्या चांगली असून तो मॅचमध्ये दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, अशी त्याची स्थिती आहे. हार्दिक पंड्या त्याच्या पूर्ण क्षमतेनं खेळतो त्यावेळी त्यानं सर्वोतकृष्ट खेळ केलेला आहे. तो फिट असल्याचे विराटनं सांगितले. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा आज होणार नसल्याचे विराट कोहलीने सांगितले आहे.
पाकिस्तानच्या किंवा जगातील कोणत्याही टीम विरोधात खेळताना पूर्ण क्षमतेनं आणि विश्वासानं सामोरं जातो. आम्ही पाकिस्तानच्या मॅचसाठी पूर्ण तयारी केली असून मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष असेल, असं विराट कोहली म्हणाला.
आयपीएलमध्ये देखील आयसीसीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीप्रमाणेच आत्ताही खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत.
आयपीएलचा फायदा होईल
विराट म्हणाला, टी-20 क्रिकेटमध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट हे खूप महत्वाचं असतं. तीन ते चार चेंडूमध्ये मॅच बदलते. गोलंदाजाच्या एका ओव्हरमध्ये हे चित्र बदलतं. आयपीएलमध्ये आम्ही जे क्रिकेट खेळलो त्याचा आम्हाला फायदा होईल, असं विराट कोहली म्हणाला.
जुन्या आकडेवारीचा विचार करत नाही
आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांना किती वेळा पराभूत केलंय, याचा आम्ही विचार केला नाही. आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे. त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतो. पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं. आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल, असं विराट कोहली म्हणाला.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: अवघ्या 43 चेंडूत संपवला सामना, श्रीलंकेची आश्चर्यकारक गोलंदाजी
T20 World Cup 2021: ऐतिहासिक! नामिबीया संघाचा आयर्लंडवर विजय, प्रथमच सुपर 12 मध्ये एन्ट्री
(Hardik Pandya is perfectly fit, can bowl, Virat Kohli tolds Team India’s strategy)