Hardik Pandya : चांगल्या लयीत नसल्याने हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातून बाहेर पडणार?, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता

काही दिवसांपूर्वीच मुंबई इंडिय़न्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉंडने "हार्दिक पंड्याची ट्रेनिंग चांगली सुरु आहे. मुंबई इंडियन्ससाठी आवश्यक त्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देत आहोत. ऑलराऊंडर हार्दिक पंड्या पूर्ण फिट होऊन मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. मात्र भारतीय टीमची गरज लक्षात घेऊन, मुंबई इंडियन्स त्याला मैदानात उतरवण्यासाठी कोणताही घाई करत नाही" असं वक्तव्य केलं होतं.

Hardik Pandya : चांगल्या लयीत नसल्याने हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातून बाहेर पडणार?, 'या' खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता
हार्दीक पंड्या
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 8:33 PM

मुंबई : यूएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सुरुवातीचे काही सामने मैदानात उतरला नव्हता. पहिल्या सामन्यात तो कर्णधार रोहित बरोबर संघाबाहेर होता. पण दुसऱ्याच सामन्यात रोहित मैदानात आला खरा पण हार्दीक मात्र मैदानात न आल्याने सारेच चिंतेत होते. त्यानंतर रविवारी (26 सप्टेंबर) आरसीबीविरुद्धच्या (MI vs RCB) सामन्यात तो संघात होता. पण त्याने काहीच खास कामगिरी न केल्याने आता आणखीच नवीन चर्चांना उधाण आलं आहे. आधी तो दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक खेळेल का? ही शंका होती. आतातर त्याचा फॉर्मही खास नसल्याने आणखीच नवीन चर्चांना उधाण आलं आहे.

हार्दीक हा मागील बराच काळ गोलंदाजी करत नव्हता. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यात त्याला स्थान देण्यात आलं. ज्यावेळी गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्याला देण्यात आल्या. पण त्याने या दोन्हीमध्ये खास कामगिरी न केल्याने सर्वांचीच निराशा झाली. त्यानंतरही टी-20 विश्वचषकाच्या संघात त्याचं नाव आलं खरं पण आता आयपीएलमध्येही खराब फॉर्म आणि दुखापत यामुळे पंड्याची विश्वतषकातील जागा जाऊ शकते.

पंड्याची जागा घेण्यासाठी ‘लॉर्ड’ सज्ज

हार्दिकच्या जागी भारतीय संघात मुंबईच्या शार्दुल ठाकूरची एन्ट्री होऊ शकते. अष्टपैलू हार्दीकला नेमका सूर गवसत नसल्याने त्याला विश्रांती देऊन सध्या राखीव खेळाडूंत नाव असलेल्या शार्दूलला थेट अंतिम भारतीय संघात स्थान  मिळू शकतं. सध्या शार्दुल एकमेव भारतीय संघातील उत्तम वेगवान गोलंदाज आहे जो फलंदाजीही उत्तम करतो.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

टी 20 विश्वचषक

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

हे ही वाचा

IPL 2021: आरसीबीच्या दमदार विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये सर्व आनंदी, एबी डिव्हिलीयर्सने केली विराटची नकल, पाहा VIDEO

IPL 2021: बलाढ्य सीएसके संघाची कमकुवत बाजू कोणती?, वीरेंद्र सेहवागने सांगितली आतली माहिती

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा कसोटी क्रिकेटला रामराम, निवृत्तीबाबत म्हणाला…

(Hardik Pandya may go out of indian team at WT20 2021 shardul thakur may replace him)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.