‘जसं तू नेहमी…’ जसप्रीत बुमराहसाठी Hardik Pandya ची इमोशनल पोस्ट
जसप्रीत बुमराह टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हार्दिक पंड्याने लिहील....
मुंबई: पाठदुखीचा सामना करणाऱ्या जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) हार्दिक पंड्याने (Hardik pandya) भावनिक पोस्ट केली आहे. बीसीसीआयने काल संध्याकाळी अधिकृतरित्या जसप्रीत बुमराह टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World cup) खेळणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर हार्दिक पंड्याने हे टि्वट केलं. मागच्या आठवड्यातच जसप्रीत बुमराह टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याचं समजलं होतं. पण काल यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं.
बुमराहच्या दुखापतीबद्दल कधी समजलं?
स्पेशलिस्टसोबत चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने जसप्रीत बुमराहबद्दलचा निर्णय जाहीर केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 आधी जसप्रीत बुमराहने पाठदुखीचा त्रास होत असल्याचं सांगितलं. लगेच त्याचं ट्रेनिंग रुटीन बंद करुन चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याची स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत बळावल्याच स्पष्ट झालं.
बुमराहची जागा कोण घेणार?
या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह टी 20 वर्ल्ड कप टीमबाहेर गेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी मोहम्मद सिराजला जसप्रीत बुमराहच्या जागी रिप्लेस केलं. टी 20 वर्ल्ड कपसाठी बुमराहची जागा कोण घेणार? ते अजून ठरलेलं नाही.
My Jassi ? Come back stronger like you always do ?❤️❤️ @Jaspritbumrah93
— hardik pandya (@hardikpandya7) October 3, 2022
हार्दिकने काय टि्वट केलय?
वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत टी 20 वर्ल्ड कपआधी हार्दिक पंड्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत हार्दिकने 105 धावा केल्या. सध्या शाहबाज अहमदने हार्दिकची जागा घेतली आहे. ‘माय जसी नेहमी करतोस तसच जोरदार कमबॅक कर’ असं हार्दिकने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलय.
भविष्याचा कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहतायत
हार्दिक पंड्या सुद्धा पाठदुखीने त्रस्त होता. म्हणून बरेच महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. यंदा आयपीएलपासून त्याने कमबॅक केलय. तेव्हापासून तो सातत्यपूर्ण प्रदर्शन करतोय. दक्षिण आफ्रिकेपासून सगळ्याच सीरीजमध्ये हार्दिकने दमदार प्रदर्शन केलय. भविष्यात टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्याकडे पाहिलं जातय.