मोठी बातमी: भारतीय संघात होणार मोठा फेरबदल, टी 20 मध्ये K L Rahul ला उपकर्णधार पदावरुन हटवणार?
पुढच्या काही दिवसात भारतीय क्रिकेट मध्ये एका मोठा महत्त्वपूर्ण बदल पहायला मिळू शकतो. सध्या के.एल.राहुल भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. पण टी 20 क्रिकेट मध्ये के.एल. राहुलला उपकर्णधार पदावरुन हटवलं जाऊ शकतं.
मुंबई: पुढच्या काही दिवसात भारतीय क्रिकेट मध्ये एका मोठा महत्त्वपूर्ण बदल पहायला मिळू शकतो. सध्या के.एल.राहुल भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. पण टी 20 क्रिकेट मध्ये के.एल. राहुलला उपकर्णधार पदावरुन हटवलं जाऊ शकतं. केएल राहुलला हटवणार, मग त्याच्याजागी उपकर्णधार कोण? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. त्याच उत्तर BCCI आणि निवड समितीने आधीच शोधून ठेवले आहे. एका खेळाडूने जबरदस्त कमबॅक केलय. तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल की, नाही असं त्याच्याबद्दल बोललं जात होतं. त्याच्या क्षमतेबद्दल मीडिया मधून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. पण त्या खेळाडूने कमबॅकच इतकं धमाकेदार केलय, की सगळ्याच टीकाकारांची तोंड बंद करुन टाकली आहेत. हा खेळाडू आहे हार्दिक पंड्या.
डेब्यु मध्येच आयपीएलच जेतेपद पटकावलं
आयपीएल 2022 पासून हार्दिक पंड्या जबरदस्त प्रदर्शन करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने डेब्यु मध्येच आयपीएलच जेतेपद पटकावलं. या स्पर्धेमधूनच हार्दिक पंड्यामधले नेतृत्वगुण दिसून आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. तिथे त्याने बॅट आणि बॉलने उत्तम प्रदर्शन केलं. आयर्लंड सीरीजसाठी नेतृत्व त्याच्याहाती होतं. तिथेही भारताने मालिका जिंकली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात त्याने उत्तम ऑलराऊंडर खेळाच प्रदर्शन केलं. वेस्ट इंडिज विरुद्धच्या चालू टी 20 मालिकेतही तो सरस खेळ खेळतोय. अवघ्या पाच महिन्यात हार्दिकने क्रिकेटच्या जाणकारांना भविष्यातील कॅप्टन म्हणून त्याची दखल घ्यायला भाग पाडलय. इनसाइट स्पोर्टने हे वृत्त दिलय.
शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला जाव लागलं
आता हार्दिक पंड्याची टी 20 क्रिकेट मध्ये केएल राहुलच्या जागी कायमस्वरुपी उपकर्णधार म्हणून नियुक्ती होऊ शकते. केएल राहुल सध्या दुखापतीचा सामना करतोय. आयपीएल नंतर तो एकही मालिका खेळू शकलेला नाही. आधी ग्रोइन इंजरीच्या गंभीर दुखापतीमुळे त्याला शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला जाव लागलं. त्यातून सावरल्यानंतर कोरोनाची लागण झाली. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेला मुकला. आता पुन्हा काही जुन्या दुखण्यांनी डोकं वर काढलय. त्यामुळे बीसीसीआयची निवड समिती टी 20 क्रिकेट मध्ये उपकर्णधारपदी हार्दिक पंड्याची कायमस्वरुपी नियुक्ती करु शकते.