Hardik pandya : आज हार्दिक पंड्या करणार दुसरं लग्न, राजस्थानमध्ये शाही विवाहाची तयारी जोरात

Hardik Pandya Wedding : जगभरात व्हॅलेंटाइन्स डे प्रेमभावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच हार्दिकने लग्नासाठी आजचा दिवस निवडलाय. हार्दिकने लग्नासाठी राजस्थानची निवड केलीय.

Hardik pandya : आज हार्दिक पंड्या करणार दुसरं लग्न, राजस्थानमध्ये शाही विवाहाची तयारी जोरात
Hardik-pandya Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 9:10 AM

Hardik Pandya Wedding : टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्या लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन्स डे आहे. जगभरात व्हॅलेंटाइन्स डे प्रेमभावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच हार्दिकने लग्नासाठी आजचा दिवस निवडलाय. हार्दिकने लग्नासाठी राजस्थानची निवड केलीय. तिथे हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. हार्दिक मॉडेल नताशा स्टॅंकोव्हिकसोबत विवाहबद्ध होणार आहे. जवळचे कुटुंबिय आणि मित्र परिवाराला या लग्नाच निमंत्रण देण्यात आलय. लग्नाच्या निमित्ताने हार्दिकला सरप्राइज देण्याचा प्लान कृणाल पंड्याने केलाय. हार्दिकने मॉडेल नताशा स्टॅंकोव्हिकसोबत विवाह केल्याचं 2020 मध्ये जाहीर केलं होंत. लग्नानंतर काही महिन्यातच नताशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. हा मुलगा आता अडीच वर्षांचा आहे.

हार्दिकने कृणालला काय गिफ्ट दिलेलं?

हार्दिक आणि कृणालमध्ये खूप चांगल बॉडिंग आहे. दोन्ही भाऊ नेहमी चांगल्या आणि वाईट दिवसात परस्परांची पाठराखण करत असतात. हार्दिकने कृणालला त्याच्या लग्नाच्यावेळी महागडं घड्याळ भेट दिलं होतं. आता कृणाल आणि पांखुरीने हार्दिक आणि नताशाला तसच बेस्ट गिफ्ट देण्याचा प्लान केलाय.

दोघांनी पहिलं लग्न कुठे केलं?

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅंकोव्हिक मे 2020 मध्ये विवाहबद्ध झाले होते. “त्यांनी कोर्टात लग्न केलं होतं. दोघांनी कधी लग्न केलं? हे कोणालाच कळलं नाही. सर्वांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. शानदार शाही विवाह करण्याचा प्लान दोघांच्या डोक्यात होता. ते आपल्या लग्नाबद्दल खूपच उत्सुक आहेत” असं जवळच्या सूत्रांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं. कोरोना काळात हार्दिक-नताशाच लग्न झालं होतं. हार्दिक-नताशा आज दुसरं लग्न करणार आहेत. लग्नासाठी व्हाइट थीम

हार्दिक-नताशा राजस्थानच्या उदयपूर शहरात लग्न करणार आहेत. दोघांचे कुटुंबीय मुंबईहून उदयपूरला पोहोचले आहेत. प्री वेडिंग फंक्शन 13 फेब्रुवारीपासूनच सुरु झालेत. यात मेहेंदी, संगीत कार्यक्रम आहे. हा विवाह सोहळा 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या लग्नसाठी व्हाइट थीम आहे. हार्दिक आणि नताशाच्या लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुणे मंडळींना व्हाइट कपडे घालावे लागणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.