गौतम गंभीरची ब्रिगेड तयार, श्रीलंका दौऱ्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ, कर्णधारपदी कोण?

Indian Squad for Sri Lanka Series: केएल राहुल याचा समावेश टी20 संघात होण्याची शक्यता नाही. संजू सॅमसन याला दोन्ही प्रकारात जागा मिळू शकते. कुलदीप यादव याला एकदिवशी मालिकेत खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. रोहित शर्माबरोबर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या मालिकेत विश्रांत घेणार आहे.

गौतम गंभीरची ब्रिगेड तयार, श्रीलंका दौऱ्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ, कर्णधारपदी कोण?
Gautam_Gambhir
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 11:13 AM

Indian Squad for Sri Lanka Series: भारतीय क्रिकेट संघाचा नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याची ब्रिगेड तयार झाली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात कोण असणार, कर्णधारपद कोणाकडे जाणार? यावर जवळपास निर्णय झाला आहे. गौतम गंभीर याचा प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच दौरा आहे. सध्या टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या ठिकाणी 5 टी20 सामने खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून 3 एकदिवशी आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वेळापत्रकही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली नाही. परंतु या आठवड्यातच भारतीय संघाची घोषण होण्याची शक्यता आहे. टी 20 मधून निवृत्ती घेतलेले कर्णधार रोहित शर्मा या दौऱ्यात जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. यामुळे भारतीय संघाची कमान टी 20 साठी हार्दिक पंड्याकडे जाणार आहे. तर एकदिवशी सामन्यांसाठी केएल राहुल याला कर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेमध्ये टी 20 मलिकेसाठी कर्णधारपद भूषविणारे शुभमन गिल याला फक्त वनडे मालिकेसाठी निवडले जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

सूर्यकुमार यादव दोन्ही प्रकारात खेळणार

केएल राहुल याचा समावेश टी20 संघात होण्याची शक्यता नाही. संजू सॅमसन याला दोन्ही प्रकारात जागा मिळू शकते. कुलदीप यादव याला एकदिवशी मालिकेत खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. रोहित शर्माबरोबर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या मालिकेत विश्रांत घेणार आहे. यामुळे कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकाव संजू सॅमसन किंवा केएल राहुल फलंदाजीसाठी येऊ शकतो. सूर्यकुमार यादवची निवड दोन्ही प्रकार होण्याची शक्यता आहे. तसेच ईशान किशन दोन्ही संघात स्थान मिळवणार आहे.

भारताचा संभाव्य T20 संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, खलील खान, खलील खान. आणि मोहम्मद सिराज.

भारताचा संभाव्य एकदिवशीय संघ:

केएल राहुल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान आणि मोहम्मद सिराज खान.

भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक

  • 26 जुलै- 1ला T20, पल्लेकेले
  • 27 जुलै- दुसरी टी-20, पल्लेकेले
  • 29 जुलै- 3रा T20, पल्लेकेले
  • 1 ऑगस्ट- पहिली वनडे, कोलंबो
  • 4 ऑगस्ट- दुसरी वनडे, कोलंबो
  • 7 ऑगस्ट- तिसरी वनडे, कोलंबो
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....