Haris Rauf Marriage: ‘कुठल्याही घोटाळ्यापासून…’, पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफने लग्नानंतर असं टि्वट का केलं?
Haris Rauf Marriage: घोटाळा आणि हॅरीस रौफच्या लग्नाचा काय संबंध?
लाहोर: पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने शनिवारी निकाह केला. इस्लामाबादमध्ये त्याने मुजना मसूद बरोबर लग्न केलं. हॅरिस रौफच्या लग्नात दिग्गज क्रिकेटर्स उपस्थित होते. हॅरिस रौफला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. लग्नानंतर हॅरिस रौफने एक टि्वट केलय. त्याची बरीच चर्चा आहे.
तुमच्या प्रार्थना आणि सदिच्छांसाठी आभारी
“माझ्या पत्नीच कुठलही सोशल मीडिया अकाऊंट नाहीय. त्यामुळे लोकांनी घोटाळ्यापासून सावध रहावं” असं हॅरिस रौफने टि्वटमध्ये म्हटलय. “माझी पत्नी मुजना मसूदच कुठल्याही प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया अकाऊंट नाहीय. कुठल्याही घोटाळ्यापासून सावध रहाव. तुमच्या प्रार्थना आणि सदिच्छांसाठी आभारी आहे” असं हॅरिस रौफने म्हटलं आहे.
‘लव्हस्टोरीची सुरुवात कधी झाली?
हॅरिस रौफ आणि मुजना मसूद यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात शाळेपासूनच झाली. दोघेही एकाच वर्गात होते. वाईट काळात मुजनाने हॅरिसला साथ दिली. हॅरिस रौफच करिअर आता चांगल चाललय. यशाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरु आहे. त्याचवेळी हॅरिस आयुष्यभरासाठी मुजनासोबत विवाहबंधनात अडकला.
Hello everyone, I just want to make it clear that my wife, Muzna Masood Malik, is not on any social media platforms. She does not have an official account. Please be cautious of any scams. Thank you so much for all of your prayers and good wishes.
— Haris Rauf (@HarisRauf14) December 25, 2022
हॅरिसच्या लग्नाला कोण-कोण आलेलं?
हॅरिस रौफच्या लग्नाला अनेक स्टार क्रिकेटर्स उपस्थित होते. यात पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि चीफ सिलेक्टर शाहीद आफ्रिदी सुद्धा होता. शाहीन आफ्रिदी सुद्धा हॅरिसच्या लग्नाला आला होता. हॅरिसने मागच्या दोन वर्षात आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलय. खासकरुन टी 20 फॉर्मेटमध्ये त्याने कमालीच प्रदर्शन केलय. आशिया कप, टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्या गोलंदाजीच कौतुक झालं होतं.