PAK vs ENG: अहो, टेस्ट कुठे? इंग्लंडच्या ‘या’ बॅट्समनसाठी ही तर T20, 6,4,4,4,6 इतकं धुतलं
PAK vs ENG: अवघ्या एक दिवसात मोडला स्वत:चाच रेकॉर्ड, इंग्लंडचा 657 धावांचा डोंगर
रावळपिंडी: इंग्लंडची टीम 17 वर्षानंतर पाकिस्तानात टेस्ट सीरीज खेळण्यासाठी पोहोचली आहे. गुरुवारपासून या टेस्ट सीरीजला सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी कमाल केली. त्यांनी थेट 506 धावा ठोकल्या. फलंदाजीमध्ये त्यांनी अनेक नवीन रेकॉर्ड बनवले. आज दुसऱ्यादिवशी सुद्धा इंग्लंडच्या फलंदाजांनी आपला आक्रमक खेळ कायम ठेवला. पहिल्या दिवशी शतक झळकवून नाबाद असलेल्या हॅरी ब्रुकने दुसऱ्यादिवशी सुद्धा तशीच बॅटिंग केली. त्याने पहिल्या दिवशी बनवलेला रेकॉर्ड दुसऱ्या दिवशी मोडला.
आज एका ओव्हरमध्ये तुफानी अंदाज दाखवला
इंग्लंडच्या या फलंदाजाने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हॅरी पहिल्यादिवशी 100 धावांवर नाबाद होता. दुसऱ्यादिवशी त्याने आणखी 53 धावा जोडल्या. आज बॅटिंग करताना त्याने एका ओव्हरमध्ये तुफानी अंदाज दाखवला. काहीवेळासाठी तो टेस्ट नाही, टी 20 क्रिकेट खेळतोय, असं वाटलं.
एका ओव्हरमध्ये चोपल्या 27 धावा
हॅरी ब्रूकने आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या जाहिद महमूदला लक्ष्य केलं. तो 83 वी ओव्हर टाकत होता. त्याने या स्पिनरच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. एकदिवस आधी त्याने बनवलेला आपलाच रेकॉर्ड तोडला. हॅरीने जाहीदच्या या ओव्हरमध्ये 27 रन्स चोपल्या. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या कुठल्याही बॅट्समनने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
हॅरीने अशी केली धुलाई
हॅरीने जाहीदच्या पहिल्या चेंडूवर सिक्स मारला. त्याने चौकारांची हॅट्रिक केली. पाचव्या चेंडूवर पुन्हा त्याने सिक्स मारला. शेवटच्या चेंडूवर त्याने तीन धावा वसूल केल्या.
Lunch on Day 2 ?️#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/oUbUbkSIBx
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 2, 2022
पहिल्या दिवशी चोपलेल्या 24 धावा
हॅरीने पहिल्यादिवशी पाकिस्तान विरुद्ध एक ओव्हरमध्ये 24 धावा चोपल्या होत्या. आज त्याने जाहीदचा आत्मविश्वास ढासळेल, अशी फलंदाजी केली. अशा प्रकारची फलंदाजी टी 20 क्रिकेटमध्ये पहायला मिळते. इंग्लंडच्या टीमने रावळपिंडीच्या सपाट पीचचा पुरेपूर फायदा उचलला. हॅरीने या मॅचमध्ये 116 चेंडूत 153 धावा चोपल्या. या इनिंगमध्ये त्याने 19 चौकार आणि 5 षटकार लगावले.