‘घरात बॉस सारखा खेळतो, पण परदेशात बॅटमधून धावाच निघत नाहीत’ गावस्करांच एका मोठ्या खेळाडूबद्दल वक्तव्य

Sunil Gavaskar: सततच्या खराब फॉर्ममुळे चेतेश्व पुजारा (Cheteshwar pujara) आणि अजिंक्य रहाणेला कसोटी संघाबाहेर करण्यात आले. त्यांच्याजागी युवा खेळाडूंना कसोटी संघात संधी देण्यात आली.

'घरात बॉस सारखा खेळतो, पण परदेशात बॅटमधून धावाच निघत नाहीत' गावस्करांच एका मोठ्या खेळाडूबद्दल वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 1:37 PM

मुंबई: सततच्या खराब फॉर्ममुळे चेतेश्व पुजारा (Cheteshwar pujara) आणि अजिंक्य रहाणेला कसोटी संघाबाहेर करण्यात आले. त्यांच्याजागी युवा खेळाडूंना कसोटी संघात संधी देण्यात आली. मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात (India vs srilanka Test) एक नवीन मधली फळी पहायला मिळाली. फार कमी संधी मिळालेल्या हनुमा विहारीने (Hanuma vihari) शानदार अर्धशतक झळकावलं. वनडाऊन आलेल्या विहारीने आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली. हनुमा विहारीला परदेशातील आव्हानात्मक कस लागणाऱ्या खेळपट्टयांवरच जास्त खेळवण्यात आलं आहे. तिथे त्याने चांगली कामगिरी केली होती. म्हणून मोहाली कसोटीत त्याला संधी मिळाली. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकवून कसोटी मालिकेत दमदार पदार्पण केलं होतं. मोहाली कसोटीआधी शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्ये स्पर्धा होती. पण श्रेयसचा फॉर्म लक्षात घेऊन रोहितने अय्यरला खेळवण्याचा योग्य निर्णय घेतला.

मयंकची निवड करणं का योग्य होतं?

सध्या भारताच्या कसोटी संघात वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी सुरु आहे. या दरम्यान भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारताच्या कसोटी संघात खेळवण्यासाठी पाच फलंदाजांची निवड केली आहे. त्यांनी तिसऱ्या स्थानासाीठी हनुमा विहारीचं योग्य पर्याय असल्याचं सांगितलं. शुभमन गिलच्या जागी मयंक अग्रवालची निवड करणं का योग्य होतं, ते ही सुनील गावस्करांनी समजावून सांगितलं.

शुभमन गिलकडे प्रतिभा आहे पण….

“मागच्या दोन महिन्यात शुभमन गिल फारसं क्रिकेट खेळलेला नाही. तो रणजी करंडक स्पर्धेतही खेळलेला नाहीय. तुम्हाला भारतीय संघातून खेळायचे असेल, तर सराव आवश्यक आहे. शुभमन गिलकडे प्रतिभा आहे, याबद्दल प्रश्नच नाही. पण शेवटी फॉर्मचा सुद्धा विचार केला पाहिजे” असे गावस्कर स्पोटर्स तकशी बोलताना म्हणाले.

हनुमा विहारीने काय चुकीचं केलय?

“तुम्ही एक गोष्ट काळजीपूर्वक पाहिली, तर तुमच्या लक्षात येईल की, मयंक अग्रवाल मायदेशात खेळताना खोऱ्याने धावा करतो. भारतात तो बॉस सारखी फलंदाजी करतो. पण परदेशात धावा करत नाही. घरच्या मैदानात धावा करत असल्यामुळे त्याला संधी मिळाली पाहिजे” असं गावस्करांच मत आहे. “हनुमा विहारीला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली पाहिजे. त्याने काय चुकीचं केलय. दक्षिण आफ्रिकेत त्याला एक संधी मिळाली. त्याने तिथे चांगली फलंदाजी केली. त्यामुळे त्याला फलंदाजीची संधी मिळाली पाहिजे” असं गावस्कर यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या Sunil Gavaskar: सुनील गावस्करांना चूक समजली, शेन वॉर्न संदर्भातील ‘त्या’ वक्तव्याबद्दल व्यक्त केली खंत IPL 2022 सुरु होण्याआधीच मोठा वाद, आयपीएल संघमालक BCCI वर भडकले, वादाचं कारण काय? Women’s World Cup 2022: आई बनल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात पाक कॅप्टनने बलाढय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकली हाफ सेंच्युरी

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.