Mumbai Indians: ‘एका सीजनमध्ये त्याची किंमत 15-16 कोटी होती’, बोल्ड निर्णय घ्या, सेहवागने MI ला सुचवला पर्याय

Mumbai Indians: पाचवेळा आयपीएलचे जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाच्या सीजनची खराब सुरुवात झाली आहे.

Mumbai Indians: 'एका सीजनमध्ये त्याची किंमत 15-16 कोटी होती', बोल्ड निर्णय घ्या, सेहवागने MI ला सुचवला पर्याय
मुंबई इंडियन्स-विरेंद्र सेहवाग Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 12:47 PM

मुंबई: पाचवेळा आयपीएलचे जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाच्या सीजनची खराब सुरुवात झाली आहे. मुंबईने पहिले तिन्ही सामने गमावून पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. स्टार खेळाडूंची उणीव या संघाला जाणवतेय. ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या (Hardik pandya) आणि नॅथन कुल्टर-नाईल सारखे खेळाडू या सीजनमध्ये दुसऱ्या टीममधून खेळतायत. जसप्रीत बुमराहला साथ देण्यासाठी त्या तोडीचा दुसरा वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्सकडे नाहीय. परदेशी वेगवान गोलंदाजांपैकी डॅनियल सॅम्स (Daniel Sams) आणि टायमल मिल्स तसेच बासिल थम्पी या भारतीय गोलंदाजाला आतापर्यंत संधी दिली आहे. पण त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होऊ शकलेली नाही. मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडकडे बघितलं, तर सध्याच्या परिस्थितीतून संघाला बाहेर काढण्यासाठी दुसरा हाय-प्रोफाइल गोलंदाज दिसत नाही. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागच्या मते मुंबई इंडियन्सकडे अनुभवहीन वेगवान गोलंदाज आहेत.

आताची बेंच स्ट्रेंथ तुम्ही बघितली, तर…

“मागच्या सीजनपर्यंत मुंबई इंडियन्सकडे नॅथन कुल्टर-नाईल सारखा वेगवान गोलंदाज होता. दुसरा गोलंदाज चांगली कामगिरी करत नसेल किंवा दुखापतग्रस्त असेल, तर त्याच्याजागी नॅथन कुल्टर-नाईलचा पर्याय होता. आताची बेंच स्ट्रेंथ तुम्ही बघितली, तर बाहेर बसलेल्या खेळाडूंना संधी देण्याआधी टीम मॅनेजमेंट दोनवेळा विचार करेल. मयांक मार्केडे, जयदेव उनाडकट, रिली मेरेडिथ आणि अर्शद खान हे गोलंदाज बेंचवर बसून आहेत. त्याशिवाय संजय यादव, अर्जुन तेंडुलकर आणि शौकीन असे काही प्लेयर्स आहेत. पण त्यांच्याकडे बासिल थम्पी किंवा डॅनियल सॅम्स यांच्या जागेवर खेळवण्याचा पर्याय म्हणून पाहता येत नाही” असे सेहवागन क्रिकबझशी बोलताना सांगितलं.

पावरप्ले मध्ये MI कडे विकेटटेकिंग बॉलर कोण?

“बेंचवर बसलेल्या गोलंदाजांपैकी जयदेव उनाडकटकडे अनुभव आहे. पुणे सुपर जायंट्ससाठी त्याने एका सीजनमध्ये चांगली कामगिरी केली होती. एकदा त्याला 15 ते 16 कोटीला विकत घेतलं होतं. पण त्या सीजनमध्ये तो प्रभावशाली कामगिरी करु शकला नव्हता. पण त्याच्यामध्ये जसप्रीत बुमराहसोबत गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. पावरप्लेमध्ये तीन षटके टाकू शकणार गोलंदाज मुंबई इंडियन्सकडे नाहीय. जसप्रीत बुमराहने पावरप्लेमध्ये तीन षटक टाकणं मुंबई इंडियन्सला परवडणार नाहीय़. मुंबई इंडियन्सची गोलंदाजीची बाजू कमकुवत वाटतेय. त्यामुळे यावेळी फलंदाजांना जास्त मेहनत करावी लागेल” असे सेहवान म्हणाला.

15-16 कोटीच्या खेळाडूला मुंबईने 1.3 कोटीत विकत घेतलं

आयपीएल 2017 मधल्या कामगिरीनंतर जयदेव उनाडकटला राजस्थान रॉयल्सने 11.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. त्यावेळी त्याने 24 विकेट काढल्या होत्या. यात हॅट्ट्रिक होती. त्यानंतर उनाडकटला आयपीएलमध्ये तशा पद्धतीची कामगिरी करता आलेली नाही. जयदेव उनाडकटला भारतीय संघात पुनरागमन करायचं आहे. आयपीएलच्या मागच्या दोन एडीशनमध्ये तो 13 सामने खेळला आहे. आठ विकेट त्याने काढल्या आहेत. मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनमध्ये जयदेव उनाडकटला 1.3 कोटी रुपयांना विकत घेतलं. सेहवागने जयदेव उनाडकटला खेळवण्याचा सल्ला मुंबई इंडियन्सला दिला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.