IPL 2024 : विकेटकीपिंगला सलाम, भुवीच्या 140 किमी प्रतितास वेगवान चेंडूवर क्लासिक स्टम्पिंग, Video
IPL 2024 : पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवन हैदराबाद विरुद्ध सामन्यात अपयशी ठरला. या डावखुऱ्या फलंदाजाने 16 चेंडूत 14 धावा केल्या. शिखर धवन ज्या पद्धतीने आऊट झाला, ते पाहून हेनरिक क्लासेनच्या विकेटकीपिंगला सलाम केला जातोय. धवनचा विकेट पहा, Video चुकवू नका.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवनने एक चूक केली. धवन सारख्या अनुभवी खेळाडूकडून अशा चुकीची अपेक्षा नसते. पंजाब किंग्स विरुद्ध धवन 16 चेंडूत 14 धावाच करु शकला. हैराण करणारी बाब म्हणजे धवन स्टम्प आऊट झाला. ते ही 140 किमी प्रति तास वेगाने आलेल्या चेंडूवर. भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर धवनचा विकेट गेला. यात हेनरिक क्लासेनची महत्त्वाची भूमिका होती. त्याच्या विकेटकीपिंगला जग सलाम करतय. पंजाब किंग्स विरुद्ध क्लासेनची बॅट चालली नाही. पण त्याने आपल्या विकेटकीपिंगने सगळ्यांच मन जिंकून घेतलं.
5 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार गोलंदाजीसाठी आला. त्याने धवनसाठी विकेटकीपर क्लासेनला स्टम्पसच्या जवळ उभं केलं. भुवनेश्वर कुमारच्या या रणनितीचा धवनवर दबाव आला. पण हैराण करणारी बाब म्हणजे विकेटकीपर स्टम्पसच्या जवळ आहे, हे माहीत असूनही धवन स्टेप आऊट होऊन खेळला. धवन पुढे येतोय हे पाहून भुवीन वेगात चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. पंजाबचा कॅप्टन धवनला हा चेंडू खेळता आला नाही. धवन क्रीजच्या बाहेर होता, तो क्रीजवर परतण्याआधीच क्लासेनने त्याची स्टम्पिंग केली. भुवीने 140 किमी प्रतितास वेगाने टाकलेला चेंडू क्लासेन ज्या पद्धतीने पकडला, ते खरच कमालीच होतं.
𝗤𝘂𝗶𝗰𝗸 𝗛𝗮𝗻𝗱𝘀 𝘅 𝗦𝘂𝗽𝗲𝗿𝗯 𝗥𝗲𝗳𝗹𝗲𝘅𝗲𝘀 ⚡️
Relive Heinrich Klaasen’s brilliant piece of stumping 😍👐
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #PBKSvSRH | @SunRisers pic.twitter.com/sRCc0zM9df
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2024
बसं, धवनच्या 5 सामन्यात इतक्याच धावा
शिखर धवनची बॅट या सीजनमध्ये शांत आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत 5 सामन्यात 152 धावा केल्या आहेत. धवनची सरासरी 30.4 आहे. त्याचा स्ट्राइक रेट 125 आहे. एका ओपनरसाठी हा स्ट्राइक रेट कमी आहे. धवनने कॅप्टन म्हणून चांगला परफॉर्मन्स करावा, अशी पंजाबच्या टीमला अपेक्षा असेल, जेणेकरुन टीमच्या अन्य प्लेयर्सना प्रेरणा मिळेल. सनरायजर्स हैदराबादकडून त्यांचा युवा फलंदाज नीतीश रेड्डीने कमालीची बॅटिंग केली. 20 वर्षाच्या या खेळाडूने 37 चेंडूत 64 धावा फटकावल्या. यात 5 सिक्स होत्या.