MI vs SRH : मुंबईची गोलंदाजी फोडताना मैदानात काय ठरलेलं? अभिषेक शर्माकडून प्लानचा खुलासा
SRH ने दमदार कमबॅक केलय. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना पराभूत केलं होतं. आता आयपीएल 2024 मधील दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने बलाढ्य मुंबई इंडियन्ससारख्या टीमवर विजय मिळवला आहे. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिच क्लासेन हैदराबादच्या विजयाचे नायक ठरले.

सध्या सनरायजर्स हैदराबाद टीमसाठी सेलिब्रेशन टाइम आहे. त्यांनी बलाढ्य मुंबई इंडियन्सवर 31 धावांनी विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक 277 धावांच्या रेकॉर्डची सनरायजर्स हैदराबाद टीमच्या नावावर नोंद झाली आहे. SRH ने दमदार कमबॅक केलय. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना पराभूत केलं होतं. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिच क्लासेन हैदराबादच्या विजयाचे नायक ठरले. या तिघांच्या बळावर हैदराबादने 3 बाद 277 धावांचा डोंगर उभारला. याआधी आरसीबीच्या नावावर सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड होता. 2013 साली पुणे वॉरियर्स विरुद्ध आरसीबीने 5 बाद 263 धावा फटकावल्या होत्या.
मॅच संपल्यानंतर 23 वर्षीय अभिषेक शर्माने मैदानावर त्याची कार्य चर्चा झाली? त्या बद्दल खुलासा केला. “ट्रेविस हेडसोबत बॅटिंग करताना मी आनंद घेतला. सध्याच्या खेळाडूंमधील तो माझा आवडता क्रिकेटर आहे. हेड त्याच्या विचारांबद्दल खूप स्पष्ट आहे. तू तुझ्या पद्धतीने खेळ हाच सल्ला त्याने मला दिला” असं अभिषेक शर्माने सांगितलं. क्लासेनकडून काय सल्ला मिळाला? त्या बद्दलही अभिषेक सांगितलं. “क्लासी तुझा प्लान काय? म्हणून मी त्याला विचारलं. आता आपण काय करायच? तो एवढ म्हणाला, तुला बॉल मिळाला तर तू मार. मला मिळाला, तर मी मारतो. हे खूप सकारात्मक होतं. हे त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा चांगलं ठरलं”
क्लासेन अभिषेकबद्दल काय म्हणाला?
क्लासेनने अभिषेकच कौतुक केलं. “अभिषेक स्पेशल आहे. फिरकी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना त्याला पाहण आनंददायी होतं. ज्या पद्धतीने तो खेळला, तो स्पेशल मुलगा आहे” असं क्लासेनने म्हटलं आहे. क्लासेन त्याच्या परफॉर्मन्समुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. विराट कोहली 98 धावांसह दुसऱ्या आणि 95 रन्ससह अभिषेक तिसऱ्या स्थानावर आहे.