पंजाब किंग्जने ज्याला चुकून खरेदी केले, तोच दमदार खेळी करत ठरला विजयाचा हिरो

पंजाब किंग्सने डिसेंबर 2023 च्या मिनी लिलावात ज्या खेळाडूला चुकून खरेदी केले होते. त्याच खेळाडूने गुजरात विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार खेळी करत विजय खेचून आणला आहे. ज्याला चुकून खरेदी केले म्हणून वाद झाला त्याने विजय खेचून आणत संघाची लाज वाचवली.

पंजाब किंग्जने ज्याला चुकून खरेदी केले, तोच दमदार खेळी करत ठरला विजयाचा हिरो
shashank singh
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 6:58 PM

पंजाब किंग्जने इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातचा पराभव केला. आयपीएलचा हा रोमांचक सामना पंजाबने 1 चेंडू शिल्लक असताना 3 गडी राखून जिंकला. पंजाबच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला तो शशांक सिंग ज्याला संघाने चुकून खरेदी केले होते. शशांकने 29 चेंडूत 61 धावांची तुफानी खेळी केली. ज्यामुळे सामना जिंकता आला. शशांकने आशुतोष शर्मासोबत 43 धावांची शानदार भागीदारी केली. 4 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हिरो ठरलेला शशांकबद्दल जाणून घेऊया.

डिसेंबर 2023 मध्ये IPL 2024 साठीच्या दुबईमध्ये झालेल्या मिनी लिलावमध्ये पंजाब किंग्सने अनकॅप्ड शशांक सिंगला 20 लाख रुपयांमध्ये खेरदी केला होता. प्रीती झिंटाच्या टीमने त्याला ‘चुकून’ विकत घेतल्याचा वाद निर्माण झाला होता. मात्र, नंतर तसे काही नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा तोच शशांक सिंग आहे ज्याने काल तुफानी खेळी केली. पंजाब किंग्ज संघाने चुकीने खरेदी केल्याचा आरोप केला होता.

अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात शशांकने 61 धावांची खेळी खेळली. ज्यामध्ये त्याने 6 फोर आणि 4 सिक्स ठोकले. शशांकच्या या खेळीमुळे पंजाबकडून विजय खेचून आणला. पंजाबने 4 पैकी 2 सामने जिंकून आयपीएल गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. 25 वर्षांचा आशुतोष देखील शशांकसारखा अनकॅप्ड खेळाडू आहे.

नाणेफेक हारल्यानंतर गुजरात टायटन्सने आधी फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 48 बॉलमध्ये 89 धावा केल्या. साई सुदर्शनने 19 बॉलमध्ये 33 धावा केल्या. केन विल्यमसनने 26, राहुल तेवतियाने नाबाद 23 रन केले. पंजाबकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक दोन विकेट घेतले होते.

पंजाबने धावांचा पाठलाग करताना 70 धावांपर्यंत मजल मारताना चार खेळाडू गमवले होते. ज्यामध्ये शिखर धवनने 1, जॉनी बेअरस्टोने 22, प्रभासिमरन सिंगने35, सॅम कुरनने 05 रन केले होते. शशांक सिंग यानंतर मैदानावर आला.  15 व्या ओव्हरमध्ये जितेश शर्मा बाद झाला आणि मग शशांक सिंग खेळायला आला.

शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकली मॅच

शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी 7 धावांची गरज होती. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने दर्शन नळकांडेकडे बॉल सोपवला. पहिल्याच बॉलवर आशुतोष शर्मा आऊट झाला, त्यानंतर पाच बॉलमध्ये सहा धावांची गरज होती. दुसऱ्या बॉलवक हरप्रीत ब्रारला एकही रन काढता आला नाही. त्यानंतर पुढच्या बॉलवर एक रन घेत शशांक सिंगला स्ट्राईक दिली गेली. शशांक सिंगने ओव्हरच्या चौथ्या बॉलवक फोर मारला. त्यानंतर शेवटच्या बॉलवर शशांकने लेग बायची धाव घेत विजय मिळवला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.