IND vs HKG: सामना हरला पण मन तिच्यात गुंतलं, हाँगकाँगच्या क्रिकेटपटूकडून स्टेडियममध्येच तरुणीला प्रपोज, VIDEO
IND vs HKG: हाँगकाँगचा खेळाडू किंचित शाहसाठी (kinchit shah) हा सामना खास आहे. कारण सामना संपल्यानंतर त्याने स्टेडियम मध्येच सर्वांसमक्ष एका तरुणीला प्रपोज केलं.
मुंबई: सलग दुसऱ्यांदा हाँगकाँगचा संघ आशिया कप (Asia cup) मध्ये खेळतोय. काल पहिल्याच सामन्यात त्यांना भारताकडून पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाने हाँगकाँगवर 40 धावांनी (IND vs HKG) विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने सुपर 4 गटात प्रवेश केला आहे. हाँगकाँगचा संघ या सामन्यात हरला. पण त्यांनी आपल्या खेळाने सर्व क्रिकेट रसिकांची मन जिंकली. हाँगकाँगचा खेळाडू किंचित शाहसाठी (kinchit shah) हा सामना खास आहे. कारण सामना संपल्यानंतर त्याने स्टेडियम मध्येच सर्वांसमक्ष एका तरुणीला प्रपोज केलं. त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली.
सर्वांसमक्ष गुडघ्यावर बसला, आणि….
ही तरुणी किंचितला आधीपासून ओळखते. ती सामना पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये आली होती. सामना संपल्यानंतर किंचित आपल्या जर्सी मध्येच प्रेक्षक स्टँडमध्ये गेला. सुरुवातीला स्टँड मध्ये बसलेल्या प्रेक्षकांना काय होतय, ते समजलं नाही. स्टँड मध्ये सफेद रंगाचा ड्रेस घालून बसलेल्या मुलीजवळ येऊन किंचित थांबला. हाँगकाँगचा हा खेळाडू गुडघ्यावर बसताच, काय प्रकरण आहे, ते प्रेक्षकांना समजलं. स्टँड मध्ये टाळ्याचा कडकडा सुरु झाला. किंचितने गुडघ्यावर बसून त्या तरुणीला प्रपोज केलं. तिने उत्तर देताच तिच्या हातात अंगठी घातली. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेले गौतम गंभीर, जतिन सप्रू आणि संजय बांगर यांनाही प्रपोजची ही पद्धत आवडली.
She said YES! ?? A heartwarming moment where Hong Kong’s @shah_kinchit95 proposed to his SO after playing a big match against India ? A huge congratulations to the happy couple. We wish you all the joy and happiness in your new life together ❤️#AsiaCup2022 #GetReadyForEpic pic.twitter.com/CFypYMaPxj
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) August 31, 2022
किंचित शाहचं भारत कनेक्शन
किंचित शाह मॅचमध्ये महत्त्वाची इनिंग खेळला. त्याने 28 चेंडूत 30 धावा केल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार होता. हाँगकाँगच्या टीमकडून बाबर हयातने सर्वाधिक 41 धावा केल्या. भारताने विजयासाठी हाँगकाँगला 193 धावांचं टार्गेट दिलं होतं. हाँगकाँगची टीम 40 धावांनी हरली. त्यांना 152 धावाच करता आल्या. किंचितचा जन्म मुंबईत झालाय. तो आता हाँगकाँग मध्ये स्थायिक झालाय.