IND vs ENG: मोहम्मद सिराजने सांगितला इंग्लंडमध्ये यशाचा फॉर्म्युला, दुसऱ्याच्या पराभवाचा अभ्यास करुन इंग्रजांवर प्रहार

IND vs ENG: भारताकडून पहिल्या डावात मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 66 धावा देत चार विकेट घेतल्या. खरंतर मोहम्मद सिराज आयपीएलमध्ये महागडा गोलंदाज ठरला होता.

IND vs ENG: मोहम्मद सिराजने सांगितला इंग्लंडमध्ये यशाचा फॉर्म्युला, दुसऱ्याच्या पराभवाचा अभ्यास करुन इंग्रजांवर प्रहार
team india Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 4:58 PM

मुंबई: भारताकडून पहिल्या डावात मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 66 धावा देत चार विकेट घेतल्या. खरंतर मोहम्मद सिराज आयपीएलमध्ये महागडा गोलंदाज ठरला होता. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्य़ा निर्णायक कसोटीत (IND vs ENG) त्याचा समावेश होणार की, नाही या बद्दल साशंकता होती. पण मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. त्याने पहिल्याडावात भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने सांगितलं की, फलंदाज जेव्हा आक्रमक झाला असेल, त्यावेळी गोलंदाजाने धैर्य ठेवणं, आवश्यक असतं. कॅप्टन जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow ) रविवारी भारताविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. त्याने सलग तिसरं शतक ठोकलं. त्याच्या शतकामुळेच भारताच्या 416 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडला 284 धावा करता आल्या. बेयरस्टोने आधी संथ सुरुवात केली. पण नंतर त्याने आक्रमक फलंदाजी सुरु केली. 140 चेंडूत 106 धावांच्या खेळीत त्याने 14 चौकार आणि दोन षटकार लगावले.

मोहम्मद सिराजने तिसऱ्यादिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितलं की, “गोलंदाज म्हणून आम्हाला धैर्य ठेवण्याची गरज होती. बेयरस्टो फॉर्म मध्ये आहे. न्यूझीलंड विरुद्ध त्याने आक्रमक फलंदाजी केली होती. त्याचा आत्मविश्वास वाढलाय हे आम्हाला माहित होतं”

भारतीय गोलंदाज यशस्वी का?

“आपले बेसिक्स पकडून ठेवणं. क्षमतेवर विश्वास ठेवणं. फक्त एका चेंडूचा प्रश्न होता. मग तो इनस्विंग असो की, पीचवर सीम करणारा चेंडू” असं सिराज म्हणाला. “इंग्लंडमध्ये फलंदाजाला चकवणं ही सामान्य बाब आहे. तुम्हाला धैर्य ठेवण्याची गरज असते. भारतीय गोलंदाजांनी आपली तयारी व्यवस्थित केली आहे. त्यांना इंग्लिश फलंदाजांच्या कमकुवत बाजू माहित आहेत” असं सिराज म्हणाला.

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून भारतीय गोलंदाज काय शिकले?

“आम्ही जेव्हा न्यूझीलंड विरुद्धची सीरीज बघितली, तेव्हा आमच्या लक्षात आलं की, आमचा प्रत्येक गोलंदाज ताशी 140 किमी पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करतो. न्यूझीलंडच्या गोलंदाजांकडे ही क्षमता नव्हती. आमच्याकडे क्षमता आहे. मागच्यावर्षी आम्ही इंग्लंड विरुद्ध खेळलो होतो. त्यामुळे आम्हाला त्यांच्या कमकुवत बाजू माहित आहेत. याच कारणामुळे आम्ही यश मिळवू शकलो” असं सिराज म्हणाला.

एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडसाठी लक्ष्य गाठणं किती कठीण असेल?

एजबॅस्टन कसोटीत दुसऱ्याडावात 350 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणं इंग्लिश फलंदाजांसाठी कठीण असेल, असं मोहम्मद सिराजच मत आहे. “पहिल्या डावात खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल होती. पण त्यानंतर विकेट सपाट झाली. त्यामुळे एकाच भागात गोलंदाजी करण्याची आमची योजना होती. चेंडू खाली राहतोय. त्यामुळे दुसऱ्याडावात आम्हाला त्याचा फायदा मिळेल” असं मोहम्मद सिराज म्हणाला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.