Rishabh Pant: कर कापल्यानंतर ऋषभ पंतच्या हातात 27 कोटींपैकी किती रक्कम येणार? जखमी झाल्यावर काय होणार?
Rishabh Pant IPL 2025 Mega Auction: कोणताही भारतीय किंवा परदेशी खेळाडू आयपीएल हंगामात एकही सामना खेळाला नाही तरीही त्याला संपूर्ण रक्कम मिळणार आहे. परंतु कोणताही खेळाडू खासगी कारणासाठी टुर्नामेंटमधून बाहेर पडला तर त्याला जितके सामने खेळला आहे, तितकी रक्कम मिळणार आहे.
Rishabh Pant IPL 2025 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 18 व्या हंगामासाठी दोन दिवसीय मेगा ऑक्शन पार पडले. यंदाच्या या लिलावात भारतीय खेळाडूंनीच भाव खाल्ला. त्यात भारताचा ऋषभ पंत सर्वाधिक किंमतीचा खेळाडू ठरला. त्याला लखनऊच्या संघाने 27 कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले. आता प्रश्न हा निर्माण झाला आहे की ऋषभ पंतच्या हातात किती रक्कम येणार आहे. त्यात कर किती कापला जाणार आहे. तसेच आयपीएल दरम्यान तो जखमी झाल्यावर त्याला किती रुपये मिळणार आहे.
भारतीक क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याने नवीन हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयपीएलमधील मेगा ऑक्सनवर त्याच्यावर लावण्यात आलेल्या बोलीवर चर्चा होऊ लागली आहे. त्याला 27 कोटी रुपये देऊन लखनऊच्या संघाने विकत घेतले आहे. आता हे सर्व पैसे ऋषभला मिळणार आहे की त्यात काही रक्कम कापली जाणार आहे. किती रक्कम त्याला कर म्हणून द्यावी लागणार आहे.
ऋषभ पंत याला मिळणार इतके पैसे
इंडियन प्रीमियर लीग 2025 लिलावात बोली लागल्यानंतर खेळाडूंसोबत तीन वर्षांचा करार केला जातो. ज्या बोलीमध्ये खेळाडूला घेतले ती रक्कम एका हंगामासाठी द्यावी लागते. आता ऋषभ पंत याला 27 कोटी रुपयांमध्ये लखनऊच्या टीमने घेतले. ते सर्व पैसे त्याला मिळणार नाही. त्यात त्याला भारत सरकारला 8.1 कोटी रुपये कर द्यावा लागणार आहे. त्यानंतर 18.9 कोटी रुपये त्याला आयपीएल टीम मानधन म्हणून देणार आहे.
आयपीएल दरम्यान जखमी झाल्यावर…
आयपीएल सामना दरम्यान ऋषभ पंत जखमी झाला तरी त्याला पूर्ण पैसे मिळणार आहे. परंतु आयपीएल सुरु होण्यापूर्वी तो जखमी झाला किंवा आयपीएल खेळू शकला नाही तर फ्रेंचाईजी दुसऱ्या खेळाडूचा समावेश करेल. परदेशी खेळाडू जखमी असेल त्याला काहीच रक्कम मिळत नाही. परंतु भारतीय खेळाडूंसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विमा काढला आहे. त्यातून त्याला संपूर्ण रक्कम मिळते.
सामना नाही खेळला तर पैसे मिळणार का?
कोणताही भारतीय किंवा परदेशी खेळाडू आयपीएल हंगामात एकही सामना खेळाला नाही तरीही त्याला संपूर्ण रक्कम मिळणार आहे. परंतु कोणताही खेळाडू खासगी कारणासाठी टुर्नामेंटमधून बाहेर पडला तर त्याला जितके सामने खेळला आहे, तितकी रक्कम मिळणार आहे.
हे ही वाचा…