Mumbai Indians ला वानखेडेवर खेळण्याचा किती फायदा होईल? रोहित शर्मा म्हणतो…
Mumbai Indians IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा 15 वा सीजन भारतात होणार आहे. पण लीग स्टेजचे सर्व सामने मुंबई आणि पुणे शहरात होणार आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा 15 वा सीजन भारतात होणार आहे. पण लीग स्टेजचे सर्व सामने मुंबई आणि पुणे शहरात होणार आहेत. मुंबईतील वानखेडे, (Wankhede Stadium) ब्रेबॉर्न आणि डी.वाय.पाटील स्टेडियमवर हे सर्व सामने होतील. मुंबईत आयपीएलचे सामने होत असल्याने घरचा संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला त्याचा सर्वाधिक फायदा होईल, असं बोललं जातय. मुंबई असा एकमेव संघ आहे, ज्यांच्या स्वत:च्या शहरात, घरच्या मैदानात सामने होत आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सला याचा फायदा होईल, म्हणून काही संघांनी विरोध केल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोन वर्षानंतर आयपीएल स्पर्धा भारतातत होतेय. मागच्यावर्षी आयपीएलची सुरुवात भारतात झाली होती. पण कोरोनामुळे स्पर्धा मध्येच थांबवून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सामने आयोजित करावे लागले. यंदा देखील कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून BCCI ने मुंबई-पुणे शहरात आयपीएलचे सामने आयोजित केले आहेत.
रोहित म्हणाला….
मुंबई इंडियन्सच्या टीमला मुंबईत खेळण्याचा अतिरिक्त फायदा मिळेल असं वाटत नाही, अंस रोहित शर्माने सांगितलं. मुंबईच्या नव्या संघातील फारच कमी खेळाडू मुंबईत खेळले आहेत, असं रोहित म्हणाला. आज रोहित शर्मा आणि कोच माहेला जयवर्धने यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. “तुलनेने हा नवीन संघ आहे. मुंबईत खेळण्याचा अतिरिक्त फायदा मिळेल असं वाटत नाही. या संघातील 70 ते 80 टक्के प्लेयर्स मुंबईत खेळलेले नाहीत” असं रोहित शर्मा म्हणाला.
रोहितने सांगितलं मुंबईत कोण-कोण खेळलं?
“मी, सूर्या, इशान, पोलार्ड आणि बुमराह मुंबईत सर्वात जास्त खेळलो आहोत. इतर खेळाडू अजून मुंबईत खेळलेले नाहीत. आम्ही दोन वर्षानंतर मुंबईत खेळतोय. या दोन वर्षात एकदाही मुंबईत खेळलेलो नाही. अन्य फ्रेंचायची मागच्यावर्षी मुंबईत खेळले होते. आम्ही खेळलो नव्हतो. त्यामुळे फायदा होणार नाही” असं रोहित शर्माने सांगितलं.
रोहित शर्मासाठी केलेलं टि्वट
O Captain, My Captain ?#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/XU8eJHrN4v
— Mumbai Indians (@mipaltan) March 22, 2022
मुंबईला मुख्य चिंता आहे ती…
सूर्यकुमार यादव ही मुंबई इंडियन्सची सध्याची सर्वात मोठी चिंता आहे. 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार खेळण्याची शक्यता कमी आहे. अंगठ्याच्या दुखापतीमधून अजून तो सावरलेला नाही. सूर्या सध्या NCA मध्ये आहे. त्याच्या दुखापतीमध्ये सुधारणा होतेय. तो लवकरच इथे असेल. तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असेल किंवा नाही याबद्दल मी तुम्हाला आता सांगू शकत नाही असं रोहित म्हणाला.
जसप्रीत बुमराहसाठीचं टि्वट
Ghar se nikalte hi ? Kuch dur chalte hi…?#OneFamily #MumbaiIndians @Jaspritbumrah93 pic.twitter.com/wGWs4WMzx2
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2022
यंदाचा फॉर्मेट वेगळा
यंदाच्या आयपीएलमध्ये दहा संघ असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ दुसऱ्या संघा विरुद्ध दोन सामने खेळणार नाहीय. यंदा स्पर्धेचा फॉर्मेट वेगळा आहे.