बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत त्या सामन्यात फॉलो-ऑनचं संकट कसं टाळलं? आकाशदीपने उघड केलं गुपित
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतासाठी गाबा कसोटी कायम स्मरणात राहिली आहे. ऋषभ पंतची खेळी असो की सध्याच्या दौऱ्यात आकाशदीप आणि जसप्रीत बुमराहची खेळी.. बुमराह-आकाशदीप जोडीने फॉलो-ऑनचं संकट टाळलं होतं. त्या खेळीबाबत आकाशदीपने आता सर्वकाही उघड केलं आहे.
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारताचा 3-1 असा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने ही कसोटी मालिका दहा वर्षांनी आपल्या नावावर केली आहे. या कसोटी मालिकेत एक क्षण असा होता की आरामात मालिका ड्रॉ होईल. पण ऑस्ट्रेलियाने मालिकेचा रोख आपल्याकडे वळवण्यात यश मिळालं. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. आकाशदीप सिंह या कसोटी मालिकेत चमकला. त्याने या मालिकेत पाच गडी बाद केले. आकाशदीपने ब्रिस्बेन कसोटी मालिकेतही चांगली खेळी केली. ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल असा वाटणारा सामना चिवट खेळीने लांबवला. तर मेलबर्न कसोटी सामना भारताच्या हातात होता. पण काही चुका अंगलट आल्या. भारताने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला 91 धावांवर 6 विकेट अशा स्थितीत आणलं होतं. पण मार्नस लाबुशेनने अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला तारलं. जर या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 130 धावांवर रोखलं असतं तर टीम इंडियाने हा सामना जिंकला असा असं मत आकाश दीपने व्यक्त केलं आहे.
आकाशदीपने पीटीआयशी बोलताना बुमराहसोबत केलेल्या खेळीचा उल्लेख केला. त्याने बुमराहसोबत शेवटच्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली होती. ‘त्या दिवशी माझ्या डोक्यात होतं की, कोणत्याही प्रकारची दुखापत सहन करण्यास तयार आहे. पण आऊट होणार नाही. मला धावा करणं गरजेचं होतं. मला कोणत्याही परिस्थितीत दीर्घकाळ फलंदाजी करायची होती. माझ्या डोक्यात फॉलोऑन वाचवणं असं काही नव्हतं. माझ्या डोक्यात दीर्घकाळ फलंदाजी करणं हेच सुरु होतं. आमच्या फलंदाजांना दुसऱ्या डावात तितक्या कमी वेळ फलंदाजी करावी लागेल. त्या दिवशी चेंडू चांगल्या प्रकारे पाहात होतो.’
गाबा कसोटीत आकाश दीपने 31 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या 31 धावांमुळे फॉलोऑनचं संकट टळलं होतं. आकाश दीपने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, ‘ही बॅट विराट कोहलीची होती. यावर एमआरएफ लिहिलं होतं.’ दरम्यान या बॅटबाबत सांगताना आकाशदीप म्हणालाकी, विराट कोहलीकडून मागणं खूपच कठीण काम होतं. पण विराट कोहलीने स्वत:हून बॅट दिली. ‘विराट कोहलीने मला विचारलं बॅट हवी आहे का? मी असंच म्हंटलं हा भैया, तुझी बॅट कोणाला नको असेल. मग काय त्याने बॅट दिली.’