Yashasvi Jaiswal | बँड्रामधील 78 कोटीच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर कसं बदललं यशस्वी जैस्वालचं आयुष्य?
Yashasvi Jaiswal | यशस्वी जैस्वाल. त्याचा प्रवास सोपा नाहीय. यशस्वी जैस्वाल आज कोट्याधीश क्रिकेटपटू असला, तरी त्याने मुंबईत पाणी पुरी सुद्धा विकली आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. डॉमिनिका येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. पहिल्या टेस्ट मॅचआधी टीम इंडियाच्या एका खेळाडूची बरीच चर्चा आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजमध्ये आज तो डेब्यु करणार आहे. त्याचं नाव आहे, यशस्वी जैस्वाल. त्याचा प्रवास सोपा नाहीय. यशस्वी जैस्वाल आज कोट्याधीश क्रिकेटपटू असला, तरी त्याने मुंबईत पाणी पुरी सुद्धा विकली आहे.
यशस्वी जैस्वालने मुंबईतील बॅण्ड्रा येथील 78 कोटीच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर त्याच्या क्रिकेट करीयरने एक वेगळं वळणं घेतलं. तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल 78 कोटीच घर कोणाच? यशस्वीने हे घर विकत घेतलय का?
त्या घरात राहणारी व्यक्ती विशेष
त्या घरात असं काय आहे, ज्याने यशस्वी जैस्वालच आयुष्य बदललं. टीम इंडियाकडून खेळण्याच्या त्याच्या स्वप्नांना प्रेरणा दिली. खरंतर ते घर खास नाहीय, त्या घरात राहणारी व्यक्ती विशेष आहे. त्याला भेटल्यानंतर यशस्वी जैस्वालने कधी मागे वळून बघितलं नाही. तो आयुष्यात पुढेच जात राहीला. यशस्वीला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीमत्वाच नाव आहे, सचिन तेंडुलकर.
यशस्वीचा त्या 78 कोटीच्या घरात प्रवेश कसा झाला?
आता प्रश्न हा आहे की, यशस्वी जैस्वाल सचिन तेंडुलकरच्या बॅण्ड्र पेरी क्रॉस रोडवरील 78 कोटीच्या घरात कसा पोहोचला?. त्याची गोष्ट अशी आहे की, सचिनने यशस्वीच्या संघर्षाची गोष्ट ऐकली, त्यानंतर त्याला भेटण्यासाठी बोलावलं. अर्जुन तेंडुलकर स्वत: यशस्वीला सचिन तेंडुलकर यांच्याकडे घेऊन गेला होता. यशस्वीची तेव्हा अंडर 19 टीममध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली होती. अर्जुन तेंडुलकर सुद्धा त्या टीमचा भाग होता.
सचिनने काय गिफ्ट केलेलं?
सचिन 45 मिनिटं यशस्वी बरोबर बोलला. यशस्वी सचिन बरोबर बोलण्यात इतका गुंतून गेला की, फोटो काढायच सुद्धा त्याच्या लक्षात राहिलं नाही. सचिन तेंडुलकरने त्याच्या स्वाक्षरीची बॅट यशस्वीला गिफ्ट केली होती. यशस्वीने ती बॅट जपून ठेवली आहे. त्या घरात जाऊन आल्यानंतर यशस्वीच आयुष्य कसं बदललं?
सचिन तेंडुलकरच्या घरी जाऊन आल्यानंतर यशस्वी जैस्वालच आयुष्य कसं बदललं? या प्रश्नाच उत्तर यशस्वीच्या परफॉर्मन्समधून मिळतं. जानेवारी 2019 मध्ये यशस्वी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यु केला. त्याचवर्षी सप्टेंबर महिन्यास लिस्ट ए डेब्यु केला. त्यानंतर त्याची अंडर 19 वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली. त्याच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा झाली. त्यामुळे IPL 2020 मध्ये त्याच्या कोट्यवधीची बोली लागली.