Virat kohli on odi series: ‘मी वनडे सीरीजसाठी उपलब्ध, रोहितची उणीव जाणवेल’
मुंबई: भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वनडे मालिकेत खेळणार की, नाही, यावरुन सुरु झालेल्या उलट-सुलट चर्चांना अखेर विराटनेच पूर्णविराम दिला आहे. “मी वनडे सीरीजसाठी उपलब्ध आहे. एकदिवसीय मालिका खेळायला तयार आहे” असे खुद्द विराटनेच आज पत्रकार परिषदेत सांगितले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर उद्या भारतीय संघ रवाना होणार आहे. त्याआधी कोहलीने आज पत्रकार परिषद घेतली. […]
मुंबई: भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वनडे मालिकेत खेळणार की, नाही, यावरुन सुरु झालेल्या उलट-सुलट चर्चांना अखेर विराटनेच पूर्णविराम दिला आहे. “मी वनडे सीरीजसाठी उपलब्ध आहे. एकदिवसीय मालिका खेळायला तयार आहे” असे खुद्द विराटनेच आज पत्रकार परिषदेत सांगितले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर उद्या भारतीय संघ रवाना होणार आहे. त्याआधी कोहलीने आज पत्रकार परिषद घेतली. कसोटी मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीबद्दल विराट म्हणाला की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आम्हाला रोहितच्या अनुभवाची कमतरता जाणवेल” ‘रोहितचा अनुभव आणि कौशल्याची उणीव भासेल’ असे विराट म्हणाला.
मी नेतृत्व करणार नाही, हे आधीच सांगितलं होतं
“दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी मी उपलब्ध आहे. मी एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार नाही, हे निवड समितीच्या सदस्यांनी मला कळवलं होतं” असं विराटने सांगितलं. टी-20 आणि वनडेच्या कर्णधारपदी विराटच्या जागी निवड समितीने रोहित शर्माची निवड केली आहे, तेव्हापासून वादाच्या वावड्या उठत आहेत, या सर्व प्रश्नांना आज विराटने उत्तर दिली.
त्यांनाच जाऊन प्रश्न विचारा
“मी निवडीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही असे प्रश्न मला विचारु नयेत. उलट हे प्रश्न तुम्ही जे, मी उपलब्ध नाही, असं लिहितात त्यांना आणि त्यांच्या सूत्रांना विचारा. मी निवडीसाठी नेहमीच उपलब्ध आहे” असे कोहलीने पत्रकारांना सांगितले.
कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळणार नाही, त्याने ब्रेक मागितला आहे, अशी कालपासून मीडियामध्ये चर्चा होती. “या चर्चेत अजिबात तथ्य नाही. मी वनडेसाठी उपलब्ध आहे आणि खेळण्यासाठी नेहमीच गंभीर होतो. जे खोट्या बातम्या लिहितात त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा” असे विराट म्हणाला.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी कोहलीच्या ब्रेक मागण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. “ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही, पण वेळ योग्य असली पाहिजे” असं मोहम्मद अझरुद्दीन यांनी म्हटलं होतं. अझरने त्याच्या टि्वटमधून भारताच्या या दोन खेळाडूंमध्ये मतभेद असल्याचे संकेत दिले होते. पण गावस्करांना हे मत पटलं नव्हतं.
संबंधित बातम्या: ‘खेळापेक्षा कोणी मोठा नाही’, क्रीडा मंत्री ठाकूर यांचं विराट-रोहित वादावर स्पष्ट मत Sachin tendulkar : मास्टर ब्लास्टरची नवी ‘इनिंग’; कार कंपनीत कोट्यावधींची गुंतवणूक! ‘आव्हानांचा विचार केला, तर…’, टेस्ट टीममध्ये निवड झाल्यानंतर प्रियांक म्हणाला…