‘पण मी तिथे नव्हतो, मला खूप वाईट वाटलं’, T20 वर्ल्ड कप नंतर प्रसिद्ध क्रिकेटपटूची खंत
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या प्रसिद्ध क्रिकेटपटूला पुन्हा एकदा नशिबाने दिला दगा
नवी दिल्ली: हार्दिक पंड्या पाठदुखीमधून सावरत असताना, वेंकटेश अय्यरचा ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आला होता. हार्दिक पंड्याचा पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. IPL 2021 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून त्याने दमदार प्रदर्शन केलं. त्याबळावर त्याने भारतीय क्रिकेट टीममध्ये प्रवेश केला. टीम इंडियाकडून तो 9 T20 आणि दोन वनडे सामने खेळला. त्यानंतर त्याला टीममधून वगळण्यात आलं.
‘तो’ स्पर्धेत मागे पडला
आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पंड्याने जबरदस्त प्रदर्शन केलं. हार्दिकने टीममध्ये जोरदार कमबॅक केलं. त्याचा परफॉर्मन्स पाहून त्याला थेट टी 20 टीमच कॅप्टन बनवण्यात आलं. त्यामुळे वेंकटेश अय्यर स्पर्धेत मागे पडला. त्याने पुन्हा मध्य प्रदेशकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली.
मैदानात कधी उतरणार?
27 वर्षीय वेंकटेशने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत राजस्थान विरुद्ध 62 धावा फटकावून 6/20 अशी कामगिरी केली. त्यानंतर तीन सामन्यात 57,42 आणि 28 धावा फटकावल्या. वेंकटेश अय्यर फॉर्ममध्ये परतता असतानाच पुन्हा एकदा त्याला दुखापत झालीय. वेंकटेश अय्यरसाठी स्थानिक सीजन संपल्यात जमा आहे. वेंकटेशला टीम इंडियाकडून पुन्हा खेळायच आहे. पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला तो पुन्हा मैदानात उतरेल.
रिहॅबच्या प्रोसेसमध्ये
बंगळुरुत NCA मध्ये वेंकटेश अय्यर रिहॅबच्या प्रोसेसमध्ये आहे. नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळाल्यामुळे त्याने निराशा व्यक्त केली. क्रिकेटनेक्सट डॉट कॉमशी तो बोलत होता. टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली नाही, त्यावरही वेंकटेश व्यक्त झाला.
एक संधी म्हणून पाहतो
“मला टीम इंडियाकडून खेळायच आहे. हार्दिक पंड्याने कसं कमबॅक केलय, ते मी पाहिलं. त्याने खूपच उत्तम कामगिरी केली. प्रत्येक संघाला वर्ल्ड कपसाठी बेस्ट टीम निवडायची असते. मला त्या टीममध्ये खेळायच होतं, पण ते माझ्या हातात नाही. मी क्रिकेटकडे एक संधी म्हणून पाहतो” असं वेंकटेशने सांगितलं.
फक्त संधी मिळू दे, मग बघा….
“मी टीम इंडियाकडून खेळत नाहीय. त्यावेळी माझ्याकडे आयपीएल आणि राज्य संघाकडून खेळण्याचा पर्याय आहे. सिलेक्शनची चिंता न करता, मला माझं काम योग्य पद्धतीने केलं पाहिजे. आता चालू असलेल्या टी 20 मालिका आणि वनडे टीममध्ये मला कदाचित संधी मिळाली असती, पण दुर्देवाने मला दुखापत झालीय. मला जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मी माझ्याबाजूने सर्वोत्तम कामगिरी करेन” असं वेंकटेश अय्यर म्हणाला.