‘ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारखी दक्षिण आफ्रिकेची स्थिती करणार’, सीरीजआधी टीम इंडियाची गर्जना

"आमचे वेगवान गोलंदाज आमचं बलस्थान आहेत. इथलं वातावरण, परिस्थितीचा फायदा उचलून ते आम्हाला प्रत्येक कसोटीत 20 विकेट मिळवून देतील" असा विश्वास पूजाराने व्यक्त केला.

'ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारखी दक्षिण आफ्रिकेची स्थिती करणार', सीरीजआधी टीम इंडियाची गर्जना
भारतीय कसोटी संघ
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 3:32 PM

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South africa tour) येत्या 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत भारताचे वेगवान गोलंदाज आपली चांगली कामगिरी कायम ठेवून, प्रत्येक कसोटी सामन्यात 20 विकेट मिळवून देतील, असा विश्वास भारताचा मध्यल्याफळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar pujara) व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर टीम इंडियाने तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी तशा पद्धतीचा सराव सुरु केला आहे. फलंदाजांनी नेटमध्ये शनिवारी सराव केला.

“आमचे वेगवान गोलंदाज आमचं बलस्थान आहेत. इथलं वातावरण, परिस्थितीचा फायदा उचलून ते आम्हाला प्रत्येक कसोटीत 20 विकेट मिळवून देतील” असा विश्वास पूजाराने व्यक्त केला. “आम्ही परदेशात खेळतो, तेव्हा आमचे वेगवान गोलंदाज हा दोन संघांमधला फरक असतो” असे पुजाराने म्हटले आहे. “तुम्ही ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधली आमची कामगिरी पाहिली, तर विशेष करुन आमच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेतही ते हेच सातत्य कायम राखतील” असा विश्वास पुजाराने व्यक्त केला.

चेतेश्वर पुजारा भारताचा मधल्याफळीतील फलंदाज असून त्याने 92 कसोटी सामन्यात 6589 धावा केल्या आहेत. सध्या पुजाराच्या बॅटमधूनही धावा आटल्या असून आगामी आफ्रिका दौऱ्यात त्याला सूर सापडेल, अशी अपेक्षा आहे. पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्यात पारंगत आहे. भारतीय संघ या दौऱ्यात कुठलाही सराव सामना खेळणार नाही. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिंएटच सावट या दौऱ्यावर आहे. “भारतात आम्ही कसोटी सामने खेळलोय, ही चांगली बाब आहे” असे पुजाराने सांगितले.

“सर्वच खेळाडू टच मध्ये असून जेव्हा तयारीचा भाग येतो, त्यावेळी आमचा सपोर्ट स्टाफ उत्तम आहे. ते नेहमी आम्हाला मदत करतात. पहिल्या कसोटी सामन्याआधी आमच्याहातात पाच ते सहा दिवस आहेत” असे पुजारा म्हणाला. भारतीय संघ 16 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला. सेंच्युरीयनवरच्या बॉक्सिंग डे कसोटीआधी मिळालेला 10 दिवसांचा वेळ पुरेसा आहे, असे पुजाराने सांगितले.

संबंधित बातम्या:

स्टीव्ह स्मिथचे बेडरुममधील चाळे पत्नीने केले उघड, मध्यरात्री एकच्या सुमारास…. ‘भारतीयही बोलतील, आमच्याकडे बाबर-रिझवान सारखे खेळाडू नाहीत’, पाकच्या माजी क्रिकेटपटूने उधळली मुक्ताफळं Ind vs SA: केएल राहुल उपकर्णधार झाल्याने मुंबईकर अजिंक्य रहाणेचं संघातील स्थान धोक्यात? 26 डिसेंबरला काय होणार?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.