वर्ल्डकप फायनलबाबत ICC ने जाहीर केला मोठा निर्णय, भारतीय चाहते नाराज

india vs australia : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला होता. या फायनल सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे वर्ल्डकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं होतं. त्यावर आता आयसीसी काय म्हटले आहे पाहा.

वर्ल्डकप फायनलबाबत ICC ने जाहीर केला मोठा निर्णय, भारतीय चाहते नाराज
indian team
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 5:29 PM

ICC Rating : 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला होता. आयसीसीचे सामनाधिकारी आणि झिम्बाब्वेचा माजी फलंदाज अँडी पायक्रॉफ्ट यांनी मैदानाच्या आऊटफिल्डचे वर्णन अतिशय चांगले असल्याचे सांगितले. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीला सरासरी असल्याचे म्हटले आहे.

आयसीसीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ज्या खेळपट्टीवर अंतिम सामना खेळला गेला ती खेळपट्टी अतिशय संथ होती, ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा सहा गडी राखून पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 ओव्हरमध्ये फक्त 240 धावा केल्या होत्या. विकेट लवकर गमवल्याने भारतीय संघ चांगला स्कोर उभा करु शकला नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 43 षटकांत हे लक्ष्य गाठले होते. त्यांच्या वतीने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती.

लीग स्टेजमध्ये कोलकाता, लखनौ, अहमदाबाद आणि चेन्नईच्या खेळपट्ट्या ज्यावर भारत अनुक्रमे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता, त्यांनाही आयसीसीने सरासरी घोषित केले आहे.

उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला होता त्या वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीने चांगले रेटिंग दिले आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारताला खेळपट्टी बदलण्यात आली होती आणि हा सामना नवीन खेळपट्टीऐवजी पूर्वी वापरलेल्या खेळपट्टीवर खेळवण्यात आल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले होते.

आयसीसीने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीला ही सरासरी घोषित केले आहे ज्यावर ज्यावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा उपांत्य सामना खेळला गेला होता. कमी धावसंख्येच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 49.4 षटकात 212 धावांत गुंडाळले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाने ४७.२ षटकांत ७ गडी राखून लक्ष्य गाठले. आयसीसीचे सामनाधिकारी आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी मात्र ईडन गार्डन्सचे आऊटफील्ड अतिशय चांगले असल्याचे म्हटले होते.

या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिले 10 सामने जिंकले होते. टीम इंडियाचा केवळ फायनलमध्ये पराभव झाला होता. भारताकडून विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी यांसारखे खेळाडू या विश्वचषकात सर्वात मोठे गेम चेंजर्स ठरले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.