Test Team ची घोषणा, विराटसह, रोहित आणि बुमराहला डच्चू
टीममध्ये आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांसह यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह या तिघांचाही समावेश नसल्याने क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत.
मुंबई | येत्या 25 जानेवारीपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेला श्रीगणेशा होत आहे. इंग्लंड क्रिकेट टीम काही दिवसांपूर्वीच हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी भारतात दाखल झाली आहे. पहिला सामन्याआधी इंग्लंडच्या हॅरी ब्रूक याने टेस्ट सीरिजमधून माघार घेतली आहे. त्यामुळे इंग्लंडचं टेन्शन वाढलंय. तर दुसऱ्या बाजूला टेस्ट टीमची घोषणा करण्यात आलेली आहे. या टीममध्ये टीम इंडियाचा नियमित कॅप्टन रोहित शर्मा याच्यासह इतर आघाडीच्या खेळाडूंचा समावेश नाही.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. दोन्ही दिग्गजांना संघात स्थान मिळालेलं नाही. टीममधून अनेकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. रोहित आणि विराट या दोघांना टीममधून बाहेर केल्याने क्रिकेट चाहत्यांना विश्वासच बसत नाही. इतकंच काय तर स्टार बॉलर जसप्रीत बुमराह याला देखील संघात स्थान नाही. आयसीसीने टीम जाहीर केली. या टीममध्ये कोण आहे? कुणाला कॅप्टन केलंय? हे जाणून घेऊयात.
आयसीसीने टेस्ट टीम ऑफ द ईअरची घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या सर्वोत्त कसोटी संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचा समावेश करण्यात आलेला नाही. आयीसीसीच्या या टीममध्ये फक्त 2 भारतीयांचाच समावेश केला गेला आहे.
आयसीसीकडून टीम जाहीर
The Men’s Test Team of the Year for 2023 consists of a host of classy performers headed by Australia’s courageous skipper 💥
Find out who made the cut 👇https://t.co/rPgPBOYSL9
— ICC (@ICC) January 23, 2024
आयसीसीच्या टीममध्ये 2 भारतीय
टीम इंडियाची फिरकी ऑलराउंडर जोडी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांना संघात संधी मिळवण्यात यश आलं आहे. या दोघांव्यतिरिक्त आयसीसीच्या टीममध्ये एकही भारतीय नाही.
पॅट कमिन्स कॅप्टन
आयसीसीच्या या टीममध्ये एकूण 5 ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, पॅट कमिन्स, एलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. पॅट कमिन्स या टीमचा कर्णधार आहे.
तसेच इंग्लंडच्या 2, श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी 1 खेळाडूचा या संघात समावेश आहे. इंग्लंडकडून जो रुट आणि स्टुअर्ट ब्रॉड या दोघांना संधी मिळालीय. तर श्रीलंकेकडून दिमथ करुणारत्ने आणि न्यूझीलंडच्या केन विलियमसन यांना स्थान मिळवण्यात यश आलंय.
आयसीसी टेस्ट टीम ऑफ द ईअर | पॅट कमिन्स (कॅप्टन), केन विलियमसन, उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जो रुट, स्टुअर्ट ब्रॉड आणि दिमथ करुणारत्ने.