ICC Annual Ranking: 5 वर्षानंतर टीम इंडियाचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलिया नंबर 1 टेस्ट टीम, जाणून घ्या वनडे-T20 मध्ये कोण बेस्ट आहे?
ICC Annual Ranking: आयसीसीच्या वर्षभराच्या टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) नंबर 1 टेस्ट टीम बनली आहे. भारताच्या टीमने 2016 ते 2021 अशी सलग पाच वर्ष आयसीसी टेस्ट मेस जिंकली होती.
मुंबई: विराट कोहलीच्या (Virat kohli) नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमध्ये एक वेगळी उंची गाठणाऱ्या टीम इंडियाला झटका बसला आहे. सलग पाच वर्ष आयसीसी टेस्ट मेस जिंकणारी (ICC Ranking) टीम इंडिया आता नंबर 1 पोझिशनवर नाहीय. यंदा ही टेस्ट मेस ऑस्ट्रेलियाला मिळणार आहे. आयसीसीच्या वर्षभराच्या टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) नंबर 1 टेस्ट टीम बनली आहे. भारताच्या टीमने 2016 ते 2021 अशी सलग पाच वर्ष आयसीसी टेस्ट मेस जिंकली होती. भारताचे 119 गुण असून वार्षिक रँकिंग 2 आहे. न्यूझीलंडची टीम 111 गुणांसह वार्षिक क्रमवारीत तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानची टीम पाचव्या स्थानावर आहे.
टीम इंडियाच नंबर 1
कसोटीमध्ये भारताच्या क्रमवारीत एका स्थानाची घसरण झाली आहे. पण टी 20 फॉर्मेटमध्ये टीम इंडिया नंबर 1 च आहे. 2019 पासून आतापर्यंत जितक्या टी 20 च्या मालिका झाल्यात, त्यात टीम इंडियाचं प्रदर्शन उत्तम राहिलं आहे. त्यामुळे 270 रेटिंग पॉइंटसह ते नंबर 1 वर आहेत. इंग्लंडची टीम 265 रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे.
Australia hold onto a solid lead as annual update to @MRFWorldwide ICC Men’s Test Team Rankings is announced ?
More ?https://t.co/KDEMiJUIrn
— ICC (@ICC) May 4, 2022
वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 कोण?
न्यूझीलंडचा संघ वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 वर आहे. मे 2019 ते 2022 पर्यंत न्यूझीलंडने बेस्ट कामगिरी केली आहे. त्यांनी फक्त एक रेटिंग पॉइंटच्या अंतराने इंग्लंडला मागे टाकलं आहे. भारतीय संघ चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. वनडे रँकिंगमध्ये श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानची खराब स्थिती आहे. श्रीलंका 8 व्या. वेस्ट इंडिज 9 व्या आणि अफगाणिस्तान 10 व्या स्थानावर आहे. वनडे रँकिंगमध्ये सर्वात तळाला पापुआ न्यू गिनीचा संघ आहे. ते 20 व्या स्थानावर आहेत.