T20 Cricket New Rule : ICC चे T20 क्रिकेटमध्ये नवे नियम लागू, धिमी षटकं टाकल्यास मोठी शिक्षा
आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटवर दंड आकारण्याचा नियम आयसीसीने लागू केला आहे. तसेच, सामन्यादरम्यान ड्रिंक्स इंटरव्हल घेण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. हे नियम जानेवारी 2022 पासून लागू होतील.
मुंबई : आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटवर दंड आकारण्याचा नियम आयसीसीने लागू केला आहे. तसेच, सामन्यादरम्यान ड्रिंक्स इंटरव्हल घेण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. हे नियम जानेवारी 2022 पासून लागू होतील. नवीन नियमांनुसार, जर एखादा संघ ओव्हर रेटमध्ये निर्धारित वेळेपेक्षा मागे असेल, तर उर्वरित षटकांमध्ये एक क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर उभा राहू शकणार नाही. त्याला 30 यार्डच्या आत उभे राहावे लागेल. सध्या पॉवरप्लेनंतर (पहिली सहा षटके) पाच क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर उभे राहू शकतात. मात्र नवीन नियमानुसार संघाची चूक असेल तर केवळ चारच क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर उभे राहू शकतील. (ICC brings massive penalty for slow over-rate in T20, and drinks comes up with drinks break)
आतापर्यंत स्लो ओव्हर रेटसाठी फक्त दंड आकारला जात होता आणि दोषी संघातील खेळाडूंच्या मानधनातील पैसे कापले जात होते. यासोबतच संघाच्या कर्णधाराला डिमेरिट गुणही दिले जात होते. नवीन नियम आल्यानंतरही जुनी शिक्षा कायम राहणार आहे. हे नियम लागू झाल्यानंतर, पहिला आंतरराष्ट्रीय T20 सामना वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात 16 जानेवारी रोजी जमैकामधील सबिना पार्क येथे खेळवला जाईल. त्याच वेळी, महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना या नियमांनुसार 18 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.
आयसीसीने काय म्हटलं?
आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ओव्हर रेटचे नियम आधीच ठरलेले आहेत. या अंतर्गत, क्षेत्ररक्षण करणारा संघ शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू निर्धारित वेळेत टाकण्याच्या स्थितीत असावा. जर तो संघ हे करू शकला नाही तर आता त्यांच्याकडे उरलेल्या षटकांमध्ये 30 यार्डच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक कमी असेल. आयसीसी क्रिकेट समितीच्या शिफारशीनुसार हे बदल लागू करण्यात आले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या द हंड्रेड स्पर्धेत असा नियम पाहून त्यांनी या नियमाचा विचार केला. सर्व फॉरमॅटमध्ये खेळाचा वेग सुधारण्यासाठी हे केले गेले आहे.
अडीच मिनिटांचा ड्रिंक्स इंटरव्हल
आयसीसीने टी-20 सामन्यांदरम्यान ड्रिंक्सच्या इंटरव्हललाही परवानगी दिली आहे. हा इंटरव्हल ऐच्छिक असेल. म्हणजेच कोणताही संघ त्यांच्या इच्छेनुसार हा ब्रेक घेऊ शकतात. हा ब्रेक अडीच मिनिटांचा असेल. सध्या या ड्रिंक्स ब्रेकची सुरुवात द्विपक्षीय मालिकेने होईल. यासाठी दोन्ही संघांना मालिका सुरू होण्यापूर्वी एकमेकांशी सहमती दर्शवावी लागेल.
इतर बातम्या
IND vs SA : तिसऱ्या कसोटीत विराट कोहली खेळणार का? कोच राहुल द्रविड म्हणाला…
IND vs SA : द. आफ्रिकेतील पहिल्या कसोटी मालिकाविजयासाठी भारताला केपटाऊनचा इतिहास बदलणे गरजेचे!
IND vs SA : जोहान्सबर्गमधला पराभव जिव्हारी, टीम इंडियाचा WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर
(ICC brings massive penalty for slow over-rate in T20, and drinks comes up with drinks break)