World Cup 2023 | अफगाणिस्तानचा मेंटॉर बनण्याआधी अजय जडेजाने पाकिस्तानात का केला होता फोन?
World Cup 2023 | अफगाणिस्तानच्या विजयानंतर अजय जडेजाला सलाम. वर्ल्ड कप 2023 च्या 22 व्या सामन्यात अफगाणिस्तानच्या टीमने कमालीचा खेळ दाखवला. त्यांनी बलाढ्य पाकिस्तानला धूळ चारली. अफगाणिस्तानची टीम चालू वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त खेळ दाखवतेय.
नवी दिल्ली : वर्ल्ड कप 2023 मध्ये अफगाणिस्तानच्या टीमने कमालीचा खेळ दाखवलाय. या टुर्नामेंटच्या 22 व्या मॅचमध्ये अफगाणी टीमने पाकिस्तानवर 8 विकेट राखून एकतर्फी विजय मिळवला. पाकिस्तानने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 7 विकेटवर 282 धावा केल्या. पण इतकी मोठी धावसंख्या अफगाणी टीमने सहज चेज केली. अफगाणिस्तान टीमच्या प्रत्येक खेळाडूने या विजयात 100 टक्के योगदान दिलं. गोलंदाजीत नूर अहमद आणि नवीन उल हकने कमालीची परफॉर्मन्स दिला. इब्राहिम जादरान, रहमनुल्लाह गुरबाज, रहमत शाह आणि हशमतुल्लाह शाहिदीने जबरदस्त फलंदाजी केली. त्यांनी पाकिस्तान टीमच मनोधैर्य खच्ची केलं. अफगाणिस्तानच्या या विजयात भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाच सुद्धा योगदान आहे. अजय जडेजा अफगाणिस्तानच्या टीमचा मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक आहे. त्यांचा अनुभव अफगाणिस्तान टीमच्या उपयोगाला येतोय.
अजय जडेजा टीम इंडियासाठी 200 पेक्षा जास्त सामने खेळलाय. त्याला खेळाची कमालीची समज आहे. सहाजिक त्यांचा सल्ला अफगाण टीमच्या उपयोगाला येतोय. अफगाणिस्तान टीमने वर्ल्ड कपआधी अजय जडेजाला करारबद्ध केलं. अजय जडेजा अफगाण टीमचा भाग झाला, त्या बद्दल आता पाकिस्तानचा माजी विकेटकीपर राशिद लतीफने मोठा खुलासा केलाय. अजय जडेजाने अफगाणिस्तान टीमचा मेंटॉर बनण्याआधी मला फोन केला होता, असा राशिद खानने दावा केला आहे. अफगाणिस्तानची टीम कशी आहे? अस अजय जडेजाने राशिद खानला विचारल. त्यावर राशिद खानने जडेजाला खूपच मजेशीर उत्तर दिलं होतं. “तू त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करशील, पण शेवटी अफगाणि खेळाडूंकडून तूच बरच काही शिकून येशील” असं राशिद लतिफ जडेजाला म्हणाला होता. अजय जडेजाच अफगाणी टीमबद्दल मत काय?
अजय जडेजाला अफगाणिस्तानची टीम आवडते. अफगाणी टीमने आपल्या खेळात जितकी सुधारणा केली, दुसऱ्या टीमना तितकीच सुधारणा करण्यासाठी 50 ते 100 वर्ष लागली. मागच्या 20 वर्षात ही टीम बलशाली बनली आहे, असं अजय जडेजाच मत आहे.