ICC WTC 2023 Final जिंकणाऱ्या टीमवर पडणार पैशांचा पाऊस, इतकी आहे Prize Money ची रक्कम

ICC WTC 2023 Final जिंकणारी टीम होणार मालामाल. उपविजेत्या टीमसह तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या स्थानावरील टीम्सनाही मिळते घसघशीत रक्कम. टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण 38 लाख डॉलर्सची इनामी रक्कम.

ICC WTC 2023 Final जिंकणाऱ्या टीमवर पडणार पैशांचा पाऊस, इतकी आहे Prize Money ची रक्कम
WTC 2023 Final IND vs AUS : भारतीय फलंदाजाचा बदलेला अंदाज पाहून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे धाबे दणाणले, आक्रमकपणे फलंदाजी करण्याचा निर्धार
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 8:39 AM

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आता अवघे तीन दिवस उरले आहेत. येत्या 7 जूनपासून लंडनच्या द ओव्हल मैदानावर ICC WTC 2023 Final रंगणार आहे. फायनलमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने येतील. फायनल जिंकणाऱ्या टीमवर आयसीसीकडून पैशांचा पाऊस पडणार आहे. विजेत्या टीम आणि उपविजेत्या संघाला बक्षिसापोटी किती रक्कम मिळणार, ते आयसीसीने जाहीर केलय.

टीम इंडियासाठी बक्षिसाच्या रक्कमेपेक्षा विजेतेपद जास्त महत्वाच आहे. कारण मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी ट्रॉफीच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

बीसीसीआयसाठी फायनल महत्वाची

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. इंग्लंडमध्ये टीम इंडियाचे खेळाडू जोरदार सराव करतायत. बीसीसीआयसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खूप महत्वाच आहे. त्यासाठी बीसीसीआयने आयपीएलपासूनच तयारी केली होती.

विजेत्या टीमला किती लाख मिळणार?

दरम्यान आयसीसीने बक्षिसाच्या रक्कमेसंदर्भातही मोठी घोषणा केली आहे. विजेत्या टीमला 16 लाख डॉलर मिळणार आहेत. म्हणजे 13.21 कोटी रुपये. उपविजेत्या टीमला 8 लाख डॉलर्स म्हणजे जवळपास 6.50 कोटी रुपये मिळतील. 7 ते 11 जून दरम्यान फायनल सामना खेळला जाईल. त्याचवेळी 12 जून रिझर्व्ह डे आहे.

बक्षिसाची एकूण रक्कम किती ?

2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी जितकी इनामी रक्कम होती, आताही बक्षिसाची रक्कम तितकीच आहे. त्यावेळी केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या टीमने 16 लाखाच्या इनामी रक्कमेसह चकाकणारी गदा जिंकली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण 38 लाख डॉलरची इनामी रक्कम आहे. 9 टीम्समध्ये त्याची विभागणी होईल. कुठल्या टीमला किती रक्कम मिळाली?

दक्षिण आफ्रिकेची टीम 2021मध्ये तिसऱ्या स्थानावर होती. त्यांना 4.50 लाख डॉलर म्हणजे 3 कोटी 72 लाख रुपये मिळाले होते. इंग्लंडची टीम चौथ्या स्थानावर होती. त्यांना 3.50 लाख डॉलर 2 कोटी 90 लाख रुपये मिळाले होते. श्रीलंकेची टीम पाचव्या स्थानावर होती. त्यांना 2 लाख डॉलर्स 1 कोटी 65 लाख रुपये मिळाले होते. अन्य टीम्सना प्रत्येकी 1 लाख डॉलर्स म्हणजे 82 लाख रुपये मिळाले होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.