T20 World Cup 2021: सेमीफायनलच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, वाचा कोणत्या संघासमोर कोणाचं आव्हान?
टीम इंडिया यंदाच्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडली आहे. पण भारत असणाऱ्या गटातून न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. तर दुसऱ्या ग्रुपमधून इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ सेमीफायनलमध्ये आहेत.
T20 World Cup 2021: जागतिक क्रिकेटमधील एक ताकदवर संघ असणाऱ्या टीम इंडियाला यंदाच्या टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) सेमीफायनलमध्येही जागा मिळवता आलेली नाही. सुरुवातीचे अत्यंत महत्त्वाचे दोन सामने लागोपाठ पराभूत झाल्याने भारताला नंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर संघाच्या विजय आणि पराभवावर अवंलबूंन राहावं लागलं होतं. पण भारत असणाऱ्या ग्रुप 2 मधून पाकिस्तान 5 पैकी 5 विजयांसह सर्वात आधी सेमीफायनलमध्ये पोहोचला. तर त्याच्या पाठोपाठ न्यूझीलंडनेही 4 सामने जिंकल्याने तो भारताच्या पुढे जात सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे आता भारताविनाच सेमीफायनलचे सामने पार पडणार असून कोणत्या संघासोबत कोणत्या संघाचा सामना असणार? हे आयसीसीने जाहीर केले आहे.
आयसीसीच्या वेळापत्रकानुसार पहिला सेमीफायनलचा सामना बुधवारी (10 नोव्हेंबर) पार पडणार आहे. यावेळी न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ आमने सामने असणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. यावेळी 7 वाजता नाणेफेक होईल. दुसरा सामना शुक्रवारी (11 नोव्हेंबर) वरील वेळेप्रमाणेच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. या चारही संघातून विजयी दोन संघ रविवारी 14 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळतील.
भारताचं आव्हान का संपुष्टात आलं?
भारत असणाऱ्या ग्रुप 2 मधून पाकिस्तान 4 पैकी 4 विजयांसह सर्वात आधी सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. त्यापाठी न्यूझीलंडनेही 3 सामने जिंकल्याने तो भारताच्या पुढे होता. अशावेळी न्यूझीलंडचा संघ जर अफगाणिस्ताविरुद्ध पराभूत झाला असता तर तोही केवळ 3 विजयासंह गुणतालिकेत राहिला असता. ज्यानंतर भारताने नामिबीयाला नमवून न्यूझीलंड इतकेच विजय मिळवले असते. अशावेळी अफगाणिस्तान, भारत आणि न्यूझीलंड तिन्ही संघ तीन विजयांसह गुणतालिकेत असल्यास रनरेटच्या जोरावर भारतचं पुढील फेरीत पोहोचला असता. पण न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत 4 विजय मिळवले. ज्यामुळे भारताच्या स्वप्नांवर पाणी फिरलं.
इतर बातम्या
मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा
(ICC Men T 20 World Cup Semi final matches will be held in england vs new zealand and Pakistan vs australia)