ICC World Cup 2023 announcement : IND vs PAK वर्ल्ड कप सामन्याची तारीख जाहीर

ICC Men's Cricket World Cup 2023 schedule announcement : आज वनडे वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर झालं. यंदा क्रिकेट वर्ल्ड कप भारतात होणार आहे. सर्वांना प्रतिक्षा असेत, ती भारत-पाकिस्तान लढतीची. ती तारीख जाहीर झाली आहे.

ICC World Cup 2023 announcement : IND vs PAK वर्ल्ड कप  सामन्याची तारीख जाहीर
ind vs pak world cup 2023
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 12:41 PM

मुंबई : यंदा क्रिकेट वर्ल्ड कप भारतात होणार आहे. वर्ल्ड कप 2023 च वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपची फायनल आहे. आज वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर होत असताना सर्वांच लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे आहे. वनडे किंवा T20 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय कुठलाही वर्ल्ड कप पूर्ण होत नाही. भारत-पाकिस्तानच नाही, तर जगभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याकडे लक्ष असतं.

भारत-पाकिस्तान सामना क्रिकेटच्या मैदानावर खेळला जात असला,. तरी तो कुठल्या युद्धापेक्षा कमी नसतो. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने आयसीसी आणि वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या देशांना वर्ल्ड कपच ड्राफ्ट शेड्यूल पाठवलं होतं.

भारत-पाकिस्तान सामना कधी?

आज मुंबईत एका हॉटेलमध्ये वर्ल्ड कपच शेड्युल जाहीर झालं. ड्राफ्ट शेड्युलमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यासाठी 15 ऑक्टोबरची तारीख ठरली होती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होईल. आज जाहीर झालेल्या ओरिजनल शेड्युलमध्ये यात कोणताही बदल झालेला नाही. भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरलाच ठरलेल्या वेळेला, त्याच स्टेडियममध्ये होईल.

वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्सचा रेकॉर्ड काय?

इतर कुठल्याही सामन्यांपेक्षा वर्ल्ड कपमध्ये होणारा भारत-पाकिस्तान सामना खास असतो. मागच्या काही वर्षातील तणावपूर्ण संबंधांमुळे भारत-पाकिस्तानचे संघ सध्या फक्त आयसीसी टुर्नामेंटमध्ये परस्पराविरुद्ध खेळतात. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये फक्त एकदाच पाकिस्तानच्या टीमने टीम इंडियाला हरवलय. वनडे वर्ल्ड कपमध्ये अजूनपर्यंत तरी पाकिस्तानी टीम भारताला हरवू शकलेली नाही. फक्त एकदाच T20 वर्ल्ड कपमध्ये बाबर आजमच्या टीमने भारताला पराभूत केलय.

त्यावेळी सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला हरवलेलं

वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया 1992 पासून अजिंक्य आहे. 1992, 1996, 1999, 2003 आणि 2011 या पाचही वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलय. 2007 मध्ये दोन्ही टीम्सच साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे सामना झाला नाही. पण 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. विराटचे ते दोन सिक्स आजही आठवतात

2021 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने पहिल्यांदा टीम इंडियाला पराभूत केलं होतं. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानवर दिमाखदार विजय मिळवून मागच्या पराभवाचा वचपा काढला होता. भारताच्या विजयात विराट कोहलीने महत्वाची भूमिका बजावली होती. विराटने हॅरिस रौफला मारलेले दोन सिक्स आजही क्रिकेट रसिकांच्या चांगले लक्षात आहेत.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.