विश्वचषकातील कामगिरीनंतर ICC ने जाहीर केला टी20 संघ, एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही

यंदाची विश्वचषक स्पर्धा भारतासाठी अत्यंत खराब ठरली. स्पर्धेच्या सुरुवातीला दोन मोठ्या पराभवामुळे भारत पुन्हा स्पर्धेत पुनरागमन करु शकला नाही. ज्यामुळे सेमीफायनलपूर्वीच भारत स्पर्धेबाहेर गेला.

विश्वचषकातील कामगिरीनंतर ICC ने जाहीर केला टी20 संघ, एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही
भारतीय क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 4:42 PM

T20 World Cup 2021: यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2021) नुकताच पार पडला. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला मात देत विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. दरम्यान या संपूर्ण स्पर्धेत एक ताकदवर संघ असतानाही भारताची कामगिरी मात्र फारच खराब राहिली. सेमीफायनलपूर्वीच स्पर्धेबाहेर गेलेल्या भारताच्या एकाही खेळाडूला स्पर्धेत छाप सोडता आली नाही. याचाच परिणाम म्हणून आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम 12 खेळाडूंमध्ये भारताचा एकही खेळाडू नसल्याचं दिसून आलं.

आयसीसीने जाहीर केल्लाय या संघाचा कर्णधार म्हणून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचं नाव असून यष्टीरक्षक  म्हणून जोस बटलरचं नाव आहे. याशिवाय डेव्हिड वॉर्नरला बटलरसोबत सलामीवीर म्हणून निवडण्यात आलं आहे. तर त्यानंतर बाबर आझम, चारिथ अस्लंका,  एडन मार्कराम आणि सहाव्या स्थानावर इंग्लंडचा मोईन अली अशी नावं आहेत. तर गोलंदाजीमध्ये श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा आणि अॅडम झाम्पा यांच्यासह वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड आणि ट्रेंट बोल्टसह ए. नॉर्खिया यांची नावं आहेत. तर 12 वा खेळाडू म्हणून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचं नाव आहे.

अशी आहे आयसीसी टी 20 वर्ल्ड कप प्लेइंग 11- डेव्हिड वॉर्नर, जोस बटलर, बाबर आझम, चारिथ अस्लंका, एडन मार्कराम, मोईन अली, वानिंदु हसरंगा, अॅडम झम्पा, जोस हेझलवूड, ट्रेंट बोल्ट, अॅनरिक नॉर्खिया, शाहीन आफ्रिदी.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

भारताची विश्वचषकातील कामगिरी

भारताची स्पर्धेतील सुरवातच खराब झाली. आधी पाकिस्तानकडून 10 विकेट्सनी नंतर न्यूझीलंडकडून 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं होतं. त्यानंतरचे सर्व सामने जिंकूनही भारताला इतर संघाच्या पराभवावर पुढील फेरीत जाणं अवंलंबून होतं. भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया यांना नमवलं खरं, पण न्यूझीलंडने अधिक विजय मिळवल्यामुळे ते सेमीफायनलमध्ये पोहोचले आणि भारताचं स्पर्धेतील आव्हान संपलं.

इतर बातम्या

हार्दीक पंड्याच्या अडचणी वाढल्या, संघातून बाहेर झाल्यानंतर आता 5 कोटींची 2 घड्याळंही जप्त

Video: विश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच अजब सेलिब्रेशन, बुटातून घेतला ड्रिंक्सचा आस्वाद, नेमकं कारण काय?

भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

(ICC Most valuable player t20 announced not single indian player in team)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.