ICC Test Rankings : न्यूझीलंड संघासह खेळाडूंची गरुडझेप, टॉप 10 मध्ये तीन भारतीय, ‘हा’ फलंदाज पहिल्या स्थानावर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल झाले आहेत. न्यूझीलंडचा संघ क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहचला असून कर्णधार विल्यमसनने ही मुसंडी मारली आहे.
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) न्यूझीलंडने भारताला 8 विकेट्सने नमवत जेतेपद मिळवले. या विजयामुळेच न्यूझीलंड क्रिकेटसंघाने (New Zealand Cricket Team) आयसीसीच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. 123 गुण मिळवत न्यूझीलंडने 121 गुण असणाऱ्या भारतीय संघाला मागे टाकत हा सन्मान मिळवला आहे. विशेष म्हणजे संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या कर्णधार केन विल्यमसनने (Kane Willamson) देखील आयसीसी क्रमवारीत मुसंडी मारत पहिले स्थान पटकावले आहे. तब्बल 901 गुणांसह केन पहिल्या स्थानी विराजमान आहे. (ICC New Tesst Rankings Revealed New Zealand team and Kane Williamson On Top in List)
केनसह न्यूझीलंडच्या गोलंदाजानाही कमालीचा फायदा झाला असून नवख्या काईल जेमिसनसह ट्रेन्ट बोल्टच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत सुधार झाला आहे. दरम्यान फलंदाजाच्या यादीत तीन भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. ज्यात चौथ्या स्थानावर 812 गुणांसह विराट, सहाव्या स्थानावर रोहीत शर्मा 759 गुणांसह आणि ऋषभ पंत 752 गुणांसह सातव्या स्थानावर विराजमान आहे.
?? @BLACKCAPS captain Kane Williamson is back to the No.1 spot in the latest @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings for batting.
Full list: https://t.co/OMjjVx5Mgf pic.twitter.com/1DWGBonmF2
— ICC (@ICC) June 30, 2021
न्यूझीलंडच्या नवख्या खेळाडूंची मुसंडी
नुकताच न्यूझीलंडच्या संघात सामिल झालेला सलामीवीर डेवन कॉन्वेने WTC Final मध्ये केलेल्या अप्रतिम प्रदशर्नामुळे तो आयसीसी टेस्ट क्रमवारीत सामिल झाला आहे. जगभरातील फलंदाजात तो 43 व्या स्थानावर असला तरी तो यादीत सामिल झाल्याने आयसीसीने ट्विट करत त्याचे अभिनंदन केले आहे. कॉन्वेप्रमाणे नवखा गोलंदाज काईल जेमिसन ज्याने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडून ठेवले तोही आयसीसी क्रमवारीत सामिल झाला असून 725 गुणांसह 13 व्या स्थानावर आहे. तर सामन्यात 5 विकेट घेणारा किवी गोलंदाज ट्रेन्ट बोल्टही 738 गुणांसह 11 व्या स्थानी पोहचला आहे.
⭐️️ Devon Conway moves up 18 slots ⭐️️ Kyle Jamieson reaches career-best position
The two New Zealand stars make massive gains in the @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings ?
Full list: https://t.co/OMjjVx5Mgf pic.twitter.com/B3fEuFFBDZ
— ICC (@ICC) June 30, 2021
हे ही वाचा –
एका अर्धशतकाचा मिताली राजला फायदा, ICC Women ODI Rankings मध्ये घेतली झेप, पोहोचली ‘या’ स्थानावर
ICC Cricket T20 World Cup 2021 Schedule : टी 20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर, फायनल कधी?
IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय
(ICC New Tesst Rankings Revealed New Zealand team and Kane Williamson On Top in List)