ICC ODI Ranking: शुभमन गिलने 45 फलंदाजांना मागे टाकलं, बाबर आजमचं मोठं नुकसान

ICC ने ताज्या वनडे रँकिंगची यादी प्रसिद्ध केली आहे. फलंदाजांच्या बाबतीत बोलायच झाल्यास, कॅप्टन बाबर आजम (babar Azam) टॉपवर आहे.

ICC ODI Ranking: शुभमन गिलने 45 फलंदाजांना मागे टाकलं, बाबर आजमचं मोठं नुकसान
shubhaman-gillImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 4:55 PM

मुंबई: ICC ने ताज्या वनडे रँकिंगची यादी प्रसिद्ध केली आहे. फलंदाजांच्या बाबतीत बोलायच झाल्यास, कॅप्टन बाबर आजम (babar Azam) टॉपवर आहे. भारताचा युवा स्टार शुभमन गिलने (Shubhaman Gill) आपल्या करियर मधली सर्वश्रेष्ठ रँकिंग मिळवली आहे. गोलंदाजांबद्दल बोलायचं झाल्यास ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवुडचा फायदा झाला आहे. भारताचा युवा स्टार जसप्रीत बुमराहच्या क्रमवारीत दोन स्थानांच नुकसान झालं आहे.

शुभमन गिलचा धमाका

भारताचा युवा स्टार शुभमन गिलच्या रँकिंग मध्ये मोठी सुधारणा झाली आहे. गिलच्या क्रमवारीत 45 स्थानांची सुधारणा होऊन तो 38 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. करीयरमधली ही त्याची सर्वश्रेष्ठ रँकिंग आहे. अलीकडेच झिम्बाब्वे विरुद्ध संपलेल्या वनडे मालिकेत शेवटच्या वनडेत तो 130 धावांची इनिंग खेळला होता. ज्याचं इनाम त्याला रँकिंगच्या स्वरुपात मिळालं आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम पहिल्या स्थानावर आहे. पण पॉइंटस मध्ये त्याचं नुकसान झालं आहे. आजमनंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या इमाम उल हकचं नुकसान झालय. त्याची चौथ्या स्थानावर घसरण झालीय.

पहिल्या स्थानावर बाबर आजम (पाकिस्तान), दुसऱ्या स्थानावर रासी वन डर दुसैं (दक्षिण अफ्रीका) तिसऱ्या स्थानावर क्विंटन डी कॉक (दक्षिण अफ्रीका) चौथ्या स्थानावर इमाम उल हक (पाकिस्तान) पाचव्या स्थानावर विराट कोहली (भारत)

टॉप पाच गोलंदाज

न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्यास्थानावरील जसप्रीत बुमराहच नुकसान झालय. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह मैदानापासून लांब आहे. त्याची चौथ्या स्थानावर घसरण झालीय. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड आहे. तिसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान आहे.

1) ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) 2) जोश हेजलवुड (ऑस्ट्रेलिया) 3) मुजीब उर रहमान 4) जसप्रीत बुमराह (भारत) 5) शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.