मुंबई : दर महिन्याला क्रिकेट चाहते आणि दिग्गजांच्या मतदानातून महिन्याभरात क्रिकेटच्या मैदानावर अप्रतिम कामगिरी करणाऱ्या एका पुरुष आणि महिला खेळाडूला ICC Players of the Month पुरस्काराने सन्मानित केले जाते. मे महिन्यातील पुरुष गटातील हा पुरस्कार बांग्लादेशचा माजी कर्णधार मुशफिकुर रहीम ( Mushfiqur Rahim) याला देण्यात आला आहे. तर महिला गटात स्कॉटलंडच्या कॅथरीन ब्रायस (Kathryn Bryce) हिचा सन्मान करण्यात आला आहे. (ICC Players of the Month May award goes to Kathryn Bryce and Mushfiqur Rahim)
बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मुशफिकुर रहीमने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने 3 एकदिवसीय सामन्यांत तब्बल 237 धावा केल्या. ज्यात एका सामन्यात 125 आणि एका सामन्यात 84 धावांचा समावेश होतो. त्याच्या या महत्त्वाच्या खेळीमुळे बांग्लादेशने दोन्ही सामन्यात विजय मिळवला. मे महिन्यातील त्याच्या या अप्रतिम कामगिरीमुळेच त्याला मे महिन्यातील ICC Players of the Month हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मे महिन्यातील ICC Players of the Month महिला गटातील पुरस्कार स्कॉटलंडची अष्टपैलू खेळाडू कॅथरीन ब्रायस हिला देण्यात आला. कॅथरीनने आयर्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेतील 4 सामन्यात 5 विकेट्ससह 96 धावा देखील केल्या. स्कॉटलंड चार पैकी तीन सामन्यांत पराभूत झाला असला तरी कॅथरीनच्या अष्टपैलू खेळीमुळे तिला ICC Players of the Month पुरस्कार देण्यात आला आहे.
हे ही वाचा :
WTC Final : न्यूझीलंडने गावस्करांना तोंडावर पाडलं, भारतावर संकट, किवींच्या गोटात आनंद!
(ICC Players of the Month May award goes to Kathryn Bryce and Mushfiqur Rahim)