सूर्यकुमार यादव मुळे पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजचा फायदा, जाणून घ्या प्रकरण
सूर्यकुमार यादवमुळे (suryakumar yadav) पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमचा (babar Azam) फायदा झाला आहे.
मुंबई: सूर्यकुमार यादवमुळे (suryakumar yadav) पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमचा (babar Azam) फायदा झाला आहे. पाकिस्तानी कॅप्टन आजमला हा फायदा आयसीसीच्या ताज्या टी 20 रँकिंग (ICC T20 Ranking) मध्ये झाला आहे. सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिज विरुद्ध पाचवा आणि मालिकेतील शेवटचा टी 20 सामना खेळला नाही. त्यामुळे बाबार आजमचं नंबर 1 स्थान कायम राहिलं. फलंदाजांच्या यादीत तो नंबर 1 वर आहे. सूर्यकुमार यादवची टी 20 मधील नंबर 1 बनण्याची संधी हुकली. कारण विंडीज विरद्ध पाचव्या टी 20 सामन्यात त्याला आराम देण्यात आला. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर या भारतीय फलंदाजांनी सुद्धा आयसीसी रँकिंग मध्ये मोठी झेप घेतली आहे.
अंकांमधील फरक वाढला
सूर्यकुमार यादव नंबर 2 फलंदाज आहे. सध्या नंबर 1 वर असलेल्या बाबर आजम आणि सूर्यकुमार यादव यांच्यातील अंकांच अंतरही वाढलं आहे. भारतीय फलंदाजाच 11 पॉइंट्सच नुकसान झालय. वेस्ट इंडिज विरुद्ध चौथा टी 20 सामना खेळल्यानंतर सूर्यकुमार यादव 816 रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता. तो लवकरच बाबर आमजला मागे टाकेल, असा अंदाज वर्तवला जात होता. भले सूर्यकुमारच्या रँकिंग मध्ये घसरण झाली नाही. पण पॉइंट्सच नुकसान झालं. सूर्यकुमारचे 805 पॉइंट्स आहेत. बाबरचे 818 गुण आहेत. दोघांमध्ये 13 पॉइंट्सचा फरक आहे.
Holding on to No.1 ☝️
Babar Azam keeps the top spot on the @MRFWorldwide T20I rankings despite a push from India’s stars ?https://t.co/R0bxuSLU0q
— ICC (@ICC) August 10, 2022
टॉप 10 मध्ये एकमेव सूर्यकुमार
टी 20 च्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव हा एकमेव भारतीय आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध सूर्यकुमारच्या प्रदर्शनावर नजर टाकली, तर पहिल्या सामन्यात 24, दुसऱ्या मॅच मध्ये 11, तिसऱ्या मॅच मध्ये 76 आणि चौथ्या सामन्यात 24 धावा फटकावल्या होत्या. श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटच्या पाचव्या टी 20 मध्ये शानदार अर्धशतक झळकावलं होतं. ज्याचा फायदा बुधवारी जाहीर झालेल्या रँकिंग मध्ये झाला. अय्यरच्या क्रमवारीत 6 स्थानांची सुधारणा झालीय. तो आता 19 व्या नंबरवर पोहोचलाय. या सीरीज मध्ये 115 धावा करणाऱ्या ऋषभ पंतच्या क्रमवारीत 7 स्थानांची सुधारणा झालीय. सूर्यकुमारने या सीरीज मध्ये सर्वाधिक धावा केल्या. त्याने 135 धावा केल्या.