T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

आधी भारतात होणारा टी-20 विश्वचषक आता कोरोनाच्या संकटामुळे युएईमध्ये होणार आहे. 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे.

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात 'हे' संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर
ICC T20 World Cup 2021 Schedule Announced
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 6:42 PM

मुंबई : बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाबाबत (ICC T20 World Cup 2021) एक मोठी माहिती समोर आली आहे. आधी भारतात खेळवण्यात येणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान ही युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. या भव्य स्पर्धेतील गट आयसीसीने (ICC) नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या जागेबाबतही सर्व स्पष्ट झाले आहे. या दोन्ही संघाच्या चाहत्यांसह विश्व क्रिकेट वाट पाहत असलेल्या या सर्वात कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत आता सर्वांनाच पाहता येणार आहे.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ ग्रुप-1 मध्ये आहेत. या संघामध्ये सामने कधी आणि कसे होणार याबाबत पुढील आठवड्यात सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

t20 World Cup super 12 matches

हे आहेत सुपर 12 मधील पहिले 8 संघ

टी-20 विश्वचषकात रंगणार सुपर 12 चा थरार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) शुक्रवारी (16 जुलै)  टी-20 विश्व चषकात होणाऱ्या सामन्यांबाबत मोठी माहिती दिली. या माहितीनुसार 12 संघामध्ये रंगणाऱ्या विश्वचषकाच्या थरारात सुपर 12 स्टेजमध्ये  ग्रुप 1 मध्ये 6 आणि ग्रुप 2 मध्ये 6 संघ आपआपसांत भिडणार आहेत. ज्यामध्ये दोन्ही गटात प्रत्येकी 4 संघ आधीच निवडले असून इतर चार संघ हे दोन ग्रुप स्टेजेसच्या सामन्यांतून क्वॉलीफाय होऊन स्पर्धेत एन्ट्री घेणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये ग्रपु A मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नाम्बिया आणि नेदरलँड हे संघ आहेत. तर ग्रुप B मध्ये बांग्लादेश, स्कॉटलँड, ओमन आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत.

t 20 world cup group stages

ग्रुप स्टेजेसमध्ये आमने-सामने भिडणारे संघ

या ठिकाणी रंगणार सामने

आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता. दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने  दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.

संबंधित बातम्या 

IND vs SL : सामना सुरु होण्याआधीच श्रीलंका संघाला दोन झटके, हे दोन खेळाडू सामना खेळण्यापासून मुकणार

भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात

के एल राहुलकडे विकेटकीपिंगची धुरा, सराव सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

(ICC T20 World Cup 2021 Groups Announced India and Pakistan in Same Group at world Cup)

'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.