ICC T20 World Cup: आज श्रीलंका नामीबियाला भिडणार, जाणून घ्या वर्ल्ड कपच शेड्यूल
ICC T20 World Cup: श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही टीम्सनी टी 20 वर्ल्ड कप जिंकलाय, तरी त्यांना पहिल्या राऊंडमध्ये का खेळाव लागणार?
मुंबई: ऑस्ट्रेलियामध्ये आज रविवार 16 ऑक्टोबरपासून आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) सुरु होत आहे. आज टुर्नामेंटचा पहिला राऊंड सुरु होणार आहे. यात 8 टीममध्ये मॅचेस होतील. या राऊंडमध्ये पूर्व चॅम्पियन श्रीलंका (Srilanka) आणि वेस्ट इंडिजसारखेही (West Indies) संघ आहेत. या फेरीनंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 राऊंड सुरु होईल.
आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये पहिल्या 8 स्थानांवर असलेल्या टीम्सना थेट सुपर 12 राऊंडमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. यात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानची टीम आहे. उर्वरित 8 टीम्सचा निर्णय पहिल्या राऊंडमध्ये होईल. 8 पैकी 4 टीम्स सुपर 12 मध्ये प्रवेश करतील.
ग्रुपमधील दोन टीम्स सुपर 12 मध्ये जातील
ग्रुप ए मध्ये नामीबिया, नेदरलँड, यूएई शिवाय आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा संघ आहे. ग्रुप बी मध्ये आयर्लंड, स्कॉटलंड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजची टीम आहे. प्रत्येक टीमचा दुसऱ्या टीमबरोबर एक सामना होईल. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे संघ सहज सुपर 12 मध्ये पोहोचतील अशी अपेक्षा आहे. उर्वरित दोन टीम्स कुठल्या असतील, ते लवकरच कळेल.
वेस्टइंडीज आणि श्रीलंका प्रबळ दावेदार
वेस्ट इंडिज अशी एकमेव टीम आहे, ज्यांनी टी 20 वर्ल्ड कप दोनवेळा जिंकला आहे. 2014 चे चॅम्पियन श्रीलंकेची टीम तीन वेळा टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. चॅम्पियन असूनही या दोन टीम्सना टी 20 वर्ल्ड कपच्या पहिल्या फेरीत खेळाव लागेल.
ग्रुप बी मध्ये थोडा कठीण असेल. वेस्ट इंडिजसह आयर्लंड, झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडच्या टीम या पूलमध्ये आहेत. वेस्ट इंडिजने 10 वर्षापूर्वी पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता.
क्वालिफाइंग राऊंडच शेड्यूल
16 ऑक्टोबर (रविवार) – श्रीलंका विरुद्ध नामीबिया – जिलॉन्ग – सकाळी 09:30 वाजता
16 ऑक्टोबर (रविवार) – यूएई विरुद्ध नेदरलँड्स – जिलॉन्ग- दुपारी 01:30 वाजता
17 ऑक्टोबर (सोमवार) – वेस्टइंडीज विरुद्ध स्कॉटलंड – होबार्ट – सकाळी 09:30 वाजता
17 ऑक्टोबर (सोमवार) – झिम्बाब्वे विरुद्ध आयरर्लंड – होबार्ट – दुपारी 01:30 वाजता
18 ऑक्टोबर (मंगळवार) – नामीबिया विरुद्ध नेदरलँड्स – जिलॉन्ग – सकाळी 09:30 वाजता
18 ऑक्टोबर (मंगळवार) – श्रीलंका विरुद्ध यूएई – जिलॉन्ग – दुपारी 01:30 वाजता
19 ऑक्टोबर (बुधवार) – स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड – होबार्ट – सकाळी 09:30 वाजता
19 ऑक्टोबर (बुधवार) – वेस्टइंडीज विरुद्ध जिम्बाब्वे – होबार्ट – दुपारी 01:30 वाजता
20 ऑक्टोबर (गुरुवार) – श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स – जिलॉन्ग – सकाळी 09:30 वाजता
20 ऑक्टोबर (गुरुवार) – नामीबिया विरुद्ध यूएई – जिलॉन्ग – दुपारी 01:30 वाजता
21 ऑक्टोबर (शुक्रवार) – वेस्टइंडीज विरुद्ध आयर्लंड – होबार्ट – सकाळी 09:30 वाजता
21 ऑक्टोबर (शुक्रवार) – स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे – होबार्ट – दुपारी 01:30 वाजता