मोठी बातमी : T-20 वर्ल्ड कप भारतात होणार नाही, ‘या’ लोकप्रिय देशात ऑक्टोबरपासून थरार रंगणार!, पाहा शेड्यूल…

आयसीसी टी ट्वेन्टी वर्ल्ड कप ((ICC T20 World Cup) यूएईमध्ये (UAE) खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेची सुरुवात 17 ऑक्टोबर रोजी होईल तर स्पर्धेचा अंतिम सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. (ICC T20 World Cup held in UAE Tournament Start 17 Octomber)

मोठी बातमी : T-20 वर्ल्ड कप भारतात होणार नाही, 'या' लोकप्रिय देशात ऑक्टोबरपासून थरार रंगणार!, पाहा शेड्यूल...
ICC T20 World Cup
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 6:46 AM

मुंबई :  क्रिकेट रसिक प्रेक्षकांसाठी मोठी बातमी आहे. भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी आयसीसी टी ट्वेन्टी वर्ल्ड कप ((ICC T20 World Cup) यूएईमध्ये (UAE) खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेची सुरुवात 17 ऑक्टोबर रोजी होईल तर स्पर्धेचा अंतिम सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल, अशी माहिती आहे. एएनआयने याबद्दल ट्विट केलं आहे. परंतु आयसीसीने याबद्दलची अधिकृत घोषणा केलेली नाही. आयसीसीच्या अधिकृत घोषणेची सगळेच क्रिकेटप्रेमी वाट पाहत आहे. (ICC T20 World Cup held in UAE Tournament Start 17 October)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा 14 वा मोसम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. आयपीएलचे उर्वरित सामने आता यूएईमध्ये खेळविण्याचा निर्णय झाला आहे. काहीच दिवसांत उर्वरित स्पर्धेला सुरुवात देखील होणार आहे. आयपीएल पाठोपाठ टी ट्वेन्टी वर्ल्ड कप देखील सुरु होणार आहे. थोड्या दिवसांच्या अंतराने आयपीएलपाठोपाठ टी ट्वेन्टी स्पर्धा देखील सुरु होणार आहे.

शेड्यूल कसं असणार?

पहिल्या राऊंडमध्ये 8 संघांदरम्यान 12 सामने खेळविले जातील. यामधून चार संघ सुपर 12 साठी क्वालिफाय करतील. आठमधल्या चार टीम अव्वल 8 रँकिंगमध्ये सामिल होऊन सुपर 12 मध्ये पोहोचतील. (बांगलादेश, आर्यलंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी)

यानंतर 12 संघात एकूण 30 सामने खेळले जातील. जे सामने 24 ऑक्टोबरपासून सुरु होतील. सुपर 12 दोन विभागांमध्ये (सहा-सहा) विभाजित केल्या जातील. या मॅचेस तीन ठिकाणी होतील. दुबई अबूधाबी आणि शारजाहला मॅचेस खेळविण्याचा नियोजन होतील. यानंतर तीन नॉक आऊट सामने होतील. दोन सेमी फायनल आणि एक फायनल…!

WTC अंतिम सामन्यात पराभव, टी ट्वेन्टी स्पर्धेत काय होणार?

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसीची एकही स्पर्धा भारताने जिंकलेली नाही. अगदी टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, एकदिवसीय वर्ल्डकप, WTC… या तीन संधी भारताच्या हाती होत्या… पण कोणत्या ना कोणत्या कारणाने जेतेपदाने भारताला हुलकावणी दिली. भारताचा नुकताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडने दणदणीत पराभव केला आहे. त्यामुळे येत्या टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा असतील.

(ICC T20 World Cup held in UAE Tournament Start 17 October)

हे ही वाचा :

WTC Final मध्ये ‘या’ खेळाडूला खेळवणं भारताची चूक, माजी क्रिकेटपटूने केला मोठा दावा

WTC Final मधील पराभवानंतर सेहवागने पोस्ट केलं भन्नाट Meme, प्रसिद्ध वेब सिरीज मिर्झापुरमधील ‘तो’ डायलॉग केला शेअर

WTC Final नंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ‘या’ तीन खेळाडूंवर टांगती तलवार, संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची दाट शक्यता

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.