T20 World Cup 2022: अरेरे, श्रीलंकेला दणका देणाऱ्या नामीबियाच्या हातून लास्ट ओव्हरमध्ये निसटला विजय
T20 World Cup 2022: 122 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही नामीबियाने विरोधी टीमला घाम फोडला....
मेलबर्न: नेदरलँडसने मंगळवारी आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World cup) नामीबियावर विजय मिळवला. नेदरलँडच्या टीमने पाच विकेट राखून नामीबिया विरुद्धचा (netherlands vs namibia) सामना जिंकला. या रोमांचक सामन्यात बरेच चढ-उतार पहायला मिळाले. लास्ट ओव्हरमध्ये (Last Over) नेदरलँडच्या टीमने तीन चेंडू राखून 122 धावांचे लक्ष्य पार केले.
नामीबियाने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 6 विकेट गमावून 121 धावा केल्या. धावसंख्या कमी असूनही नामीबियाच्या टीमने दमदार खेळ दाखवला. त्यांनी नेदरलँडच्या टीमला सहजासहजी विजय मिळू दिला नाही.
विजय निश्चित दिसत होता, पण….
नामीबियाच्या टीमने पहिल्या क्वालिफायर सामन्यात श्रीलंकेला हरवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. नेदरलँडसने पहिल्या मॅचमध्ये रोमांचक सामन्यात यूएईवर विजय मिळवला होता. या मॅचमध्ये एकवेळ नेदरलँडचा विजय निश्चित दिसत होता. पण नामीबियाने मधल्या ओव्हर्समध्ये शानदार पुनरागमन केलं.
14 व्या ओव्हरमध्ये टीम अडचणीत
122 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ नेदरलँडच्या एक बाद 92 धावा झाल्या होत्या. इथून त्यांचा विजय सहजसोपा वाटत होता. पण नेदरलँडसने सातत्याने विकेट्स गमावल्या. त्यांचा डाव अडचणीत आला. 92 धावांवर मॅक्स ओ दाऊद आऊट झाला. 101 धावांवर टॉप कूपर पॅव्हेलियनमध्ये परतला. याच स्कोरवर एकरमॅनही आऊट झाला. स्कॉट एड्वर्ड्सही टीमला संकटात सोडून निघून गेला.
अशी होती लास्ट ओव्हर
लास्ट ओव्हरमध्ये नेदरलँडसला विजयासाठी 6 चेंडूत 6 धावांची आवश्यकता होती. डेविड वीजा लास्ट ओव्हर टाकत होता. पहिल्या चेंडूवर त्याने चौकार खाल्ला. नेदरलँडने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा काढून विजय मिळवला. नेदरलँडकडून मॅक्सने 35 आणि विक्रमजीत सिंहने 39 धावा केल्या.
नामीबियाकडून कोणी बॅटिंग केली?
नामीबियाने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 121 धावा केल्या. नामीबियाकडून फ्रायलिंकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 48 चेंडूत 43 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध सुद्धा फ्रायलिंकने चांगली बॅटिंग केली होती. मिचेल वान लिंगेने 19 चेंडूत 20 धावा आणि कॅप्टन गेरहार्ड इरासमसने 16 धावा केल्या.