ICC Test Ranking: जो रुटने अव्वल स्थान गमावलं, विराट कोहलीचं नुकसान, जाणून घ्या कोण आहे नंबर 1

अ‍ॅशेस मालिकेत (Ashes series) अ‍ॅडलेड मध्ये दुसरा कसोटी सामना गमावणारा इंग्लंडचा कर्णधार जो रुटला (joe Root) दुहेरी धक्का बसला आहे. आयसीसीने कसोटीमधील फलंदाजांच्या ताज्या रँकिंगची यादी प्रसिद्ध केली आहे.

ICC Test Ranking: जो रुटने अव्वल स्थान गमावलं, विराट कोहलीचं नुकसान, जाणून घ्या कोण आहे नंबर 1
Joe Root
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 4:50 PM

नवी दिल्ली: अ‍ॅशेस मालिकेत (Ashes series) अ‍ॅडलेड मध्ये दुसरा कसोटी सामना गमावणारा इंग्लंडचा कर्णधार जो रुटला (joe Root) दुहेरी धक्का बसला आहे. आयसीसीने कसोटीमधील फलंदाजांच्या ताज्या रँकिंगची यादी प्रसिद्ध केली आहे. या मध्ये जो रुटने पहिलं स्थान गमावलं असून त्याच्याजागी अ‍ॅशेस मालिकेत दमदार कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेनने अव्वल स्थान मिळवलं आहे.

लाबुशेन करीअरमध्ये पहिल्यांदाच 912 गुणांसह रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. जो रुट 897 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अ‍ॅशेस सीरीजच्याआधी कसोटी क्रमवारीत लाबुशेन चौथ्या स्थानावर होता. ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयात त्याने 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली व दुसऱ्या स्थानावर धडक मारली. अ‍ॅडलेड कसोटीत लाबुशेनने एका डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.

करीअरमधील लाबुशेनचे हे सहावे आणि अ‍ॅशेसमधील पहिले शतक होते. या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 275 धावांनी हरवून सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली. मुंबईत न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होण्याचा कर्णधार विराट कोहलीला फटका बसला. त्याच्या क्रमवारीत घसरण होऊन तो सातव्या स्थानावर आला. वनडे कर्णधार रोहित शर्मा टॉप 5 मध्ये कायम आहे. त्याच्या खात्यात 797 गुण आहेत. या दोघांशिवाय एकही भारतीय फलंदाज टॉप-10 मध्ये नाहीय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.