U19 World Cup Final, IND vs ENG: ‘हे’ 11 धुरंधर टीम इंडियाला बनवणार चॅम्पियन, अशी आहे फायनलची Playing XI
भारत आणि इंग्लंडमध्ये ICC अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु झाला आहे. अँटिगा येथे हा सामना होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अँटिग्वा: भारत आणि इंग्लंडमध्ये ICC अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु झाला आहे. अँटिगा येथे हा सामना होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी सेमीफायनलमधील आपल्या विजयी संघात कोणताही बदल केलेला नाही. भारताने सलग चौथ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत (World cup final) प्रवेश केला आहे. पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी इंग्लंड 1998 नंतर दुसऱ्यांदा अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत खेळत आहे. 24 वर्षानंतर इंग्लंडने (India vs England) अंडर 19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी उपांत्यफेरीत अफगाणिस्तान नमवलं, तर भारताने तुल्यबळ ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे.
? Toss & Team News from Antigua ?
England U19 have elected to bat against #BoysInBlue in the #U19CWC 2022 Final. #INDvENG
Follow the match ▶️ https://t.co/p6jf1AXpsy
Here’s India U19’s Playing XI ? pic.twitter.com/AF2ENFnOoU
— BCCI (@BCCI) February 5, 2022
भारताची प्लेइंग इलेवन – अंगकृष रघुवंशी, हरनूर सिंह, शेख रशीद, यश धुल, निशांत सिंधु, राज्यवर्धन हानगरगेकर, दिनेश बाना, कौशल तांबे, राज बावा, विक्की ओस्तवाल आणि रवि कुमार
इंग्लंडचा संघ– जॉर्ज थॉमस, जेकब बेथेल, टॉम प्रेस्ट, जेम्स रियू, विलियम लिक्सटन, जॉर्ज बेल, रेहान अहमद, एलेक्स होरटोन, जेम्स सेल्स, थॉमस एसपिनवॉल आणि जोशुआ बॉयडन