U19 World Cup Final: राज बावा-रवी कुमारने इंग्लंडला गुंडाळलं, वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला 190 धावांचं लक्ष्य

ICC अंडर 19 वर्ल्डकप (ICC U 19 world cup) स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर  इंग्लंडच्या टीमचा निभाव लागला नाही.

U19 World Cup Final: राज बावा-रवी कुमारने इंग्लंडला गुंडाळलं, वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला 190 धावांचं लक्ष्य
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 10:24 PM

अँटिंग्वा: ICC अंडर 19 वर्ल्डकप (ICC U 19 world cup) स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर  इंग्लंडच्या टीमचा निभाव लागला नाही. राज अंगद बावा (Raj bawa) आणि रवी कुमारच्या (Ravi kumar) भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडला अवघ्या 189 धावांवर रोखलं. अँटिंगामध्ये सुरु असलेल्या या सामन्यात इंग्लंडची टॉप आणि मीडल ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. जेम्स रियूने 95 धावांची शानदार खेळी केली. 34 धावांवर नाबाद असलेल्या जेम्स सेल्सने त्याला चांगली साथ दिली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच इंग्लंडचा संघ 189 धावसंख्येपर्यंत पोहोचला. अन्यथा इंग्लंडचा डाव खूप आधीच आटोपला असता. रियू बाद झाल्यानंतर पाच धावांमध्ये दोन विकेट गेल्या व इंग्लंडचा डाव आटोपला. रवी कुमारने चार तर राज बावाने पाच विकेट घेतल्या.

रवी कुमारने दिले झटके

भारताने सुरुवातीलाच इंग्लंडला दोन धक्के दिले. इंग्लंडला अवघ्या चार धावांवर पहिला झटका बसला. डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारने सलामीवीर जेकब बेथेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याला अवघ्या दोन धावांवर पायचीत पकडलं. त्यानंतर रवी कुमारने इंग्लंडला दुसरा धक्का दिला. कॅप्टन टॉम प्रेस्टला भोपळाही फोडू न देता रवी कुमारने तंबूत धाडलं. त्याला क्लीन बोल्ड केलं.

राज बावाने वाट लावली

राज बावाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन इंग्लंडची वाट लावून टाकली. त्याने इंग्लंडच्या वरच्या फळीतील चार फलंदाजांना तंबुची वाट दाखवली. दमदार फलंदाजी करणारा जॉर्ज थॉमस, विलियम लिक्सटन, जॉर्ज बेल आणि रेहान अहमदची विकेट त्याने काढली.

रवी कुमारने फोडली जोडी

जेम्स रियू आणि जेम्स सेल्सची जोडी रवी कुमारने फोडली. रियू 95 धावांवर बाद झाला. रवीच्या गोलंदाजीवर मिड विकेटला उभ्या असलेल्या कौशल तांबेकडे झेल गेला, तो झेल तांबेच्या हातातून सुटला होता. पण त्याने पुन्हा झेप घेऊन जबरदस्त झेल घेतला. जेम्य रियू बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर रवी कुमारने थॉमस एसपिनवॉल शुन्यावर बाद केलं. त्यानंतर जोशुआ बॉयडन आऊट करुन राज बावाने व्यक्तीगत पाचवी विकेट घेतली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.